गोंदवल्याचा मसाला, शेवयाचा ब्रॅण्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Self Help Group

माण तालुका दुष्काळी आहे. पण, इथली माणसं अतिशय कष्टाळू. त्यामुळेच येथील पुरुषांसह महिलाही अर्थार्जनाची, उन्नतीची वाट सदैव चोखाळत असतात.

गोंदवल्याचा मसाला, शेवयाचा ब्रॅण्ड

माण तालुका दुष्काळी (Drought) आहे. पण, इथली माणसं अतिशय कष्टाळू. त्यामुळेच येथील पुरुषांसह (Man) महिलाही (Women) अर्थार्जनाची, उन्नतीची वाट सदैव चोखाळत असतात. येथील माळरानात राहणाऱ्या महिलांना बचत गटाचा (Self Help Group) मार्ग मिळाला आणि त्यांनी छोटे-मोठे उद्योग व्यवसाय (Business) सुरू केले. शेवया आणि विविध प्रकारचे मसाले उत्पादन करत गोंदवल्यातील ब्रह्मानंद स्वयंसहायता महिला बचत गटाने व्यवसायात उत्कृष्ट यश मिळवले आहे.

बचत गटाची चळवळ सुरू होताच ग्रामीण भागातील महिला आपल्या आणि कुटुंबीयांच्या उन्नतीसाठी बचत करू लागल्या. या बचतीने त्याची बँकेत पत वाढली. त्यामुळे उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलाची त्यांची गरज भागून गेली. गोंदवले (ता. माण) येथील दहा महिलांनी अध्यक्षा अलका काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मानंद स्वयंसहायता महिला बचत गटाची स्थापना केली. नागरिकांच्या गरजेच्या वस्तू, पदार्थांचे उत्पादन केले तर त्यास प्रतिसाद चांगला मिळेल, या उद्देशाने गटातील अलका काटकर यांच्यासह मालन कट्टे, जयश्री कुलकर्णी, सिंधू ढवळे, नर्मदा पवार, कमल बनसोडे यांनी शेवया आणि विविध प्रकारचे मसाले उत्पादन करण्याचे ठरविले. त्यासाठी लागणारी मशिनरी, मिरची कुटण्याचा डंक, शेवया मशिन, मिक्सर, ग्राइंडर आणले. त्याचे थोडे प्रशिक्षण घेतले. शेवयासाठी दर्जेदार गहू त्या हंगामातच खरेदी करून ठेवतात. गहू चांगला असल्याने शेवयाही चवदार होतात, असे अलका काटकर यांनी सांगितले.

हेही वाचा: Satara : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक यांचं कऱ्हाडात निधन

शेवयाबरोबरच या महिला काळे तिखट, गोडा मसाला, इतर मसाले, मिरची पावडर तयार करत आहेत. गोंदवले येथे नाशिक, रत्नागिरी, पुणे, मुंबई येथील तसेच विविध भागातील भाविक येतात. ते आवर्जून येथील शेवया, तिखट, मसाले नेतात. त्याशिवाय या महिला स्थानिक बाजारपेठेत त्याचे माणदेशी मसाल्याची विक्री करतात. माणदेशी बँक तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी भरविल्या जाणाऱ्या प्रदर्शनात या मसाल्यांना व शेवयांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या ब्रह्मानंद स्वयंसहायता महिला बचत गटाची उत्पादने चांगलीच फार्मात असून या व्यवसायातून महिला आपली उन्नती साधत आहेत.

माण तालुक्यात गहू दर्जेदार पिकतो. हा गहूच आम्ही प्राधान्याने शेवयांसासाठी वापरतो. मसाल्यासाठी लागणी लालभडक, तिखट मिरच्यांप्रमाणे मसाल्यासाठी लागणारे लवंग, दालचिनीसारखा कच्चा माल दर्जेदारच वापरतो. त्यामुळे आमची उत्पादने नागरिकांच्या पसंतीला उतरली आहेत.

- अलका काटकर, अध्यक्षा, ब्रह्मानंद स्वयंसहायता महिला बचत गट, गोंदवले (ता. माण)

Web Title: Dilipkumar Chinchkar Gondavale Masala Shevaya Brand Women Self Help Group

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :womenSelf help group