esakal | सरपंचाच्या पतीवर वाळूप्रकरणी तहसीलदारांची थेट कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

satara

सरपंचाच्या पतीवर वाळूप्रकरणी तहसीलदारांची थेट कारवाई

sakal_logo
By
- सुहास शिंदे

पुसेसावळी : वडगाव जयराम स्वामी गावच्या सरपंच समिना मुलाणी यांचे पती जावेद पापालाल मुलाणी यांच्यावर तहसीलदार किरण जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वाहतूकप्रकरणी गाव कामगार तलाठी नीलू ढोके यांनी कारवाई केली.

काल सकाळी दहाच्या दरम्यान वडगाव- वांझोळी रस्त्यावर तुकाई माळ शिवारात अवैध वाळू वाहतूक करत असल्याचे समजताच पोलिस पाटील किशोर नागमल, कोतवाल जालिंदर उबाळे यांनी वाळू वाहतूक करणारा जावेद मुलाणी यांचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह अडविला. मात्र, पोलिस पाटील नागमल आणि कोतवाल उबाळे यांना अरेरावीची भाषा वापरून ट्रॅक्टरचालक मालक ,वडगावच्या सरपंच समिना मुलाणी यांचे पती जावेद पापालाल मुलाणी यांनी वाळूने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळवून विठ्ठल मंदिराशेजारी डपिंग करून पसार झाला. त्यानंतर तलाठी ढोके यांनी पोलिस पाटील, कोतवाल आणि गावातील पंचांना घेऊन वाळूचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी तहसीलदारांकडे पाठवला आहे.

दरम्यान, वाळू उपसा करून राजकीय पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी जावेद मुलाणी यांच्यावर गुन्हा नोंद होऊन कारवाई करावी, त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरपंच, सदस्यांवर अपात्रतेची कारवाई व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याची माहिती नाना घार्गे, दादासाहेब कोकाटे, संजय घार्गे, धनंजय पैठणकर, आझाद शिकलगार, बाळासाहेब भोकरे यांनी दिली.

loading image
go to top