लसीकरणावरून कोळकीत वाद; पहाटेपासून केंद्रावर लांबलचक रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolaki Primary Health Center

कोळकी येथील उपकेंद्रामध्ये आज लस घेण्यासाठी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केल्याने वादावादीचे प्रसंग घडले.

लसीकरणावरून कोळकीत वाद; पहाटेपासून केंद्रावर लांबलचक रांगा

कोळकी (सातारा) : गिरवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Giravi Primary Health Center) अंतर्गत असलेल्या कोळकी येथील उपकेंद्रामध्ये (Kolaki Primary Health Center) आज लस घेण्यासाठी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केल्याने वादावादीचे प्रसंग घडले. तब्बल एक महिना लस उपलब्ध न झाल्याने या ठिकाणी शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती. त्यामध्ये अनेकांनी पहाटे पाच वाजल्यापासून नंबर लावला होता. (Dispute Among Citizens Over Vaccination At Health Center In Kolaki Village bam92)

कोळकी सोडून काही लोक इतर जवळच्या गावचे होते. ज्या ग्रामस्थांचा दुसरा डोस होता, त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्राथमिक उपकेंद्राकडून सांगण्यात आले होते. जवळपास ३०० ग्रामस्थ आले होते. जिल्हा परिषदेकडून मात्र १४० लशींचा पुरवठा करण्यात आल्याने इथे गोंधळ उडला. गर्दीमध्ये कोरोना नियमांचे पालन झालेच नाही. स्वतःचे घर, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान हे कोळकी गावात असणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे.

मात्र, गावाकडे मतदान असणारे व भाडेकरू म्हणून इथे राहणारांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे मुख्य लाभधारकांना लसीकरणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. कोळकी गाव हे फलटण शहराला लागूनच असल्याने या ठिकाणची लोकसंख्याही जास्त आहे. त्यामुळे लस पुरत नाही. पुढील लसीकरणाच्या वेळी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामधील कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून गर्दी होणार नाही तसेच कोरोना नियमांचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Dispute Among Citizens Over Vaccination At Health Center In Kolaki Village bam92