esakal | कऱ्हाड पालिकेत पतींच्या उचापतींवरून हमरीतुमरी; महिला नगरसेविकांचा गदारोळ
sakal

बोलून बातमी शोधा

Karad Municipal

पंतप्रधान शहरी घरकुल योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्याच्या नियुक्तीवरून पालिकेच्या सभेत पतींच्या उचापतींचा महिला नगरसेविकांत गदारोळ उठला.

कऱ्हाड पालिकेत पतींच्या उचापतींवरून हमरीतुमरी

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (सातारा) : पंतप्रधान शहरी घरकुल योजनेतील (Prime Minister Urban Housing Scheme) कंत्राटी कर्मचाऱ्याच्या नियुक्तीवरून नगरपालिकेच्या (Karad Municipal) सभेत पतींच्या उचापतींचा महिला नगरसेविकांत गदारोळ उठला. नगराध्यक्षांसोबत महिला नगरसेविकांची (Female Corporator) हमरीतुमरी झाली. सभेमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्याचा ठराव बहुमताने फेटाळला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) होत्या. नगरसेविका पल्लवी पवार यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाची माहिती सभागृहात दिली. त्याला विरोध करत ‘तुमच्या पतींनी त्या कर्मचाऱ्यास दमदाटी केली होती. तीही सभागृहाला द्या’, अशी विचारणा नगराध्यक्षांनी केली. ‘वॉर्डातील कामे झाली नाहीत. त्याचा जाब माझ्या पतीने विचारला. मात्र, तुमचे पती २४ तास नगराध्यक्षांच्या केबीनमध्ये का असतात. त्याचे उत्तर द्या,’’ असा उलट प्रश्न सौ. पवार यांनी केल्याने गोंधळ उडाला. (Dispute Among Corporators In Karad Municipality Over PM Housing Scheme Political News bam92)

पालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मुदतवाढीवरून जोरदार खडांजगी झाली. त्या गदारोळात लोकशाही आघाडीच्या (Lokshahi Aghadi) नगरसेविका पल्लवी पवार विरूद्ध रोहणी शिंदे यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. उद्धट वर्तन करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याला मुदतवाढ देवू नये, अशी मागणी करून नगरसेविका पवार यांनी लावून धरली. ‘तो कर्मचारी नीट बोलत नाही, उद्धट वर्तन करतो’, असे त्यांनी सभागृहात सांगितले. हा विषय मांडताच नगराध्यक्षा शिंदे यांनी ‘त्या कंत्राटी कर्मचाऱ्याला तुमच्या पतींनी पालिकेत येवून दमदाटी केली होती, तेही तुम्हा सभागृहाला सांगा’, असा आरोप पवार यांच्यावर केला. त्याला प्रत्युत्तर देत नगरसेविका पवार यांनी ‘वॉर्डातील काम झाली नाहीत. म्हणून माझ्या पतीने जाब विचरला तर काय बिघडले, तुमचे पती २४ तास नगराध्यक्षांच्या केबिनलाच असतात. त्याची माहिती साऱ्या गावाला आहे. तेथे बसून ते काय करतात हेही साऱ्यांना माहिती आहे, तेही सांगायला लावू नका’, असे सुनावले.

हेही वाचा: 'राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदासाठी वेळ मागितली, पण..'

जिल्हा नियोजनातून जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केले. मुख्याधिकाऱ्यांनी सांगूनही तो कर्मचारी ती कामे यादीत घेत नाही. त्यामुळे लोकशाही आघाडीतर्फे त्याचा विषय नामंजूर करत असल्याचे पवार जाहीर केले. त्यावरून दोघीत आरोप- प्रत्यारोप होत गदारोळ झाला. चर्चेत महिला व बालकल्याण सभापती स्मीता हुलवान म्हणाल्या, ‘‘नगरसेविकाचा अपमान करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याची बाजू नगराध्यक्षा का घेत आहेत, महिला नगरसेविकेचा अपमान करत असेल ते ऐकूण न घेता तुम्ही व्यक्तीगत पातळीवर विचारणा करणे चुकीचे आहे.’’ नगराध्यक्षांच्या वर्तनाचा सर्वच महिला नगरसेविकांतर्फे त्यांनी जाहीर निषेध केला. यावेळी जनशक्तीचे नेते राजेंद्र यादव यांनी व लोकशाही आघाडीचे गट नेते सौरभ पाटील यांनाही कंत्राटी कर्मचाऱ्याच्या उद्धट वर्तनाचा निषेध केला. ‘जनशक्ती’ व ‘लोकशाही’ने त्या कर्मचाऱ्याच्या नियुक्तीला विरोध केल्याने तो ठराव बहुमताने फेटाळला.

Dispute Among Corporators In Karad Municipality Over PM Housing Scheme Political News bam92

loading image