आम्ही दिलेल्या कामांना मंजुरी कधी? सभापती, राष्ट्रवादीत खडाजंगी

समाजकल्याण सभापती कल्पना खाडे-राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुरेंद्र गुदगे यांच्यात वाद
Zilla Parishad Satara
Zilla Parishad Sataraesakal

सातारा : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने (Heavy Rain In Satara) दुर्गम भागातील पूल, रस्त्यासह शेतजमिनीही वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती (Zilla Parishad Satara) सभेत करण्यात आला. (Dispute Between The Speaker and NCP In The Zilla Parishad Meeting Satara bam92)

Summary

स्थायी समिती सभेत समाजकल्याण सभापती कल्पना खाडे व राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुरेंद्र गुदगे यांच्यात वाद रंगला.

स्थायी समितीची सभा अध्यक्ष उदय कबुले (President Uday Kabule) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सदस्य भीमराव पाटील, सुरेंद्र गुदगे, दीपक पवार, सुवर्णा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या सभांना शासनाच्या काही विभागांचे अधिकारी हजर राहात नसल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरणचे अधिकारी सलग दोन सभांना अनुपस्थित राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याची सूचना कबुले यांनी केली. पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने गावोगावी इन्सेनिटर मशिन बसवण्यात येणार असून, या मशिनशेजारी सॅनिटरी नॅपकिन एटीएम मशिन बसवण्याची मागणी सदस्यांनी केली. याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या सभेत निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, कोरोनाचे संकट असले तरी विकासकामांना प्राधान्य देत अनेक कामे मार्गी लागत आहेत. अनेक कामांच्या प्रशासकीय मान्यता झाल्या आहेत. २०२१-२२ च्या कामांच्या सर्व प्रशासकीय मान्यता आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना अध्यक्ष कबुले यांनी केल्या. पूरग्रस्त भागात रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यांत ४५ लाखांची तरतूद सभेत करण्यात आली. समाजकल्याण विभागाच्या विविध कामांच्या सुमारे सात कोटी रुपयांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता दोन दिवसांत दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कल्पना खाडे- सुरेंद्र गुदगे यांच्यात वाद

स्थायी समिती सभेत समाजकल्याण सभापती कल्पना खाडे व राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुरेंद्र गुदगे यांच्यात वाद रंगला. समाजकल्याण विभागाच्या प्रशासकीय मान्यता तत्काळ घेण्याची मागणी गुदगे यांनी केली. सध्या सहा कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात येत असून, सप्टेंबर महिन्यात उर्वरित कामांना मान्यता देणार असल्याचे खाडे यांनी सांगितले. मात्र, आम्ही दिलेल्या कामांना मंजुरी कधी? असा प्रश्‍न विचारत दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. याबाबत कल्पना खाडे यांच्याशी संपर्क साधला असता गुदगे यांचे गैरसमज झाले असून, त्यांची शंका दूर केल्याचे त्यांनी सांगितले.

Dispute Between The Speaker and NCP In The Zilla Parishad Meeting Satara bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com