

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बँक एम्प्लाईज युनियनमध्ये बँक सेवकांकरिता सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा करार शनिवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आला आहे. या करारानुसार १२ टक्क्यांपर्यंत पगारवाढ झाली आहे. एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२९ अखेर पाच वर्षे मुदतीचा पगारवाढीचा करार करण्यात आला.