
-सचिन शिंदे
कऱ्हाड : सरत्या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात दारूचा काळाबाजार होत असल्याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळे तो रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून मोठ्या हालचाली सुरू आहेत. फिरत्या पथकांसह जिल्ह्याच्या सीमा भागात नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्यासोबत पोलिसही सतर्क झाले आहेत. त्यामुळे सरत्या वर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्यातील अवैध दारूच्या काळाबाजारावर करडी नजर असणार आहे. त्यामुळे दीव, दमणसह गोव्यावरून जिल्ह्यात होणाऱ्या दारूच्या आयातीवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. अवैध दारूवर नियंत्रणासाठी उत्पादन शुल्क व पोलिसांनी कंबर कसली आहे.