
सातारा : नायगाव (ता. खंडाळा) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी शासनाने नुकतीच १४२.६० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास तसेच महिला प्रशिक्षण केंद्र दीर्घ कालावधीसाठी कार्यान्वित करण्यासाठी सुमारे ६७.१७ लाख अशा एकूण १४३.२७ कोटींच्या निधीस मान्यता दिली आहे. स्मारक उभारण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालन समिती स्थापन करण्यात आली आहे.