Satara : जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकारी धारेवर; प्रलंबित प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना
सातारा जिल्हा अव्वल येण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी, असे आवाहन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी पाटील यांनी मेढा नगरपंचायत कार्यालयाला भेट दिली.
"District Collector directing officials to fast-track the submission of pending proposals, emphasizing swift governance and decision-making."Sakal
मेढा : येथील प्रशासकीय कार्यालयात बुधवारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी झाडाझडती घेतली. त्यांनी तहसीलदार, नगरपंचायत कार्यालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.