
सातारा : माण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेटी देऊन शाळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. कासारवाडी, मलवडी, आंधळी या विविध शाळांना भेटी देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तसेच माण तालुक्यामध्ये कासारवाडी या गावी नव्याने सुरू असलेला व्हिलेज गोज टू स्कूल इंग्रजी विषय या शैक्षणिक उपक्रमाचे श्री. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.