Diwali Festival 2020 : साताऱ्यात झेंडूचा भाव चारशे पर्यंत जाणार?

यशवंतदत्त बेंद्रे
Saturday, 14 November 2020

दसऱ्याला चांगला दर मिळाला लक्ष्मीपूजनालादेखील मिळेल, असे लोरेवाडीतील नितेश लोरे यांनी नमूद केले. मेहनतीचे वाढीव दरामुळे चीज होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

तारळे (जि.सातारा) : विजयादशमी दसरा व दिवाळी लक्ष्मीपूजन म्हटले, की पूजेसाठी झेंडूच्या फुलांना अग्रमान असतो. दसऱ्याच्या वेळी आवक घटल्याने झेंडूच्या फुलांचा दर वधारून झेंडूला सोन्याचा दर आला होता. या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला हा दर आणखी वधारण्याची शक्‍यता आहे. सकाळी आठच्या सुमारास बाजारात 150 रुपयांपासून 180 रुपयांपर्यंतचा दर हाेता.

दसऱ्यानंतर फुलांना लक्ष्मीपूजनादिवशी मोठी मागणी असते. शुक्रवारी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला साताऱ्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीसाठी आणली होती. सकाळच्या टप्प्यात फुलांचा दर प्रतिकिलो 200 रुपये किलोच्या घरात होता. फुलांची प्रत आणि आकारानुसार दरात फरक होता. लक्ष्मीपूजनादिवशी फुलांचा दर 400 ते 500 रुपयांच्या घरात पोचेल, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्‍त केला.

ठाकरे सरकारच्या दडपशाहीचा निषेध, चंद्रकांतदादांचा सेनेवर जोरदार निशाणा 

दसऱ्याला चांगला दर मिळाला लक्ष्मीपूजनालादेखील मिळेल, असे लोरेवाडीतील नितेश लोरे यांनी नमूद केले. मेहनतीचे वाढीव दरामुळे चीज होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Festival 2020 Marigold Flowers Price Hiked In Satara Market