esakal | Diwali Festival 2020 लक्ष्मीपुजनाला फटाके उडविताना, अशी घ्या विशेष काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival 2020 लक्ष्मीपुजनाला फटाके उडविताना, अशी घ्या विशेष काळजी

गेल्या आठ महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. आता कुठे या महामारीपासून मुक्तता मिळत असल्याचे दिसत आहे. कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढल्यामुळे लोकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे संपला आहे, अशा भ्रमात राहणे तुर्तास तरी परवडणारे नाही. अशातच दिवाळी सारखा मोठा सण साजरा होत आहे. त्यामुळे कोरोनाची टांगती तलवार आजही आपल्या डोक्यावर आहे.

Diwali Festival 2020 लक्ष्मीपुजनाला फटाके उडविताना, अशी घ्या विशेष काळजी

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : दिवाळी जसा दिव्यांचा सण आहे, तसाच दिवाळीत फटाक्यांची मजाही काही औरच असते. पण, हे फटाके उडवताना जरा काळजी घेणं देखील आवश्यक आहे. फटाके उडवत असाल तर विशेष काळजी घ्यावी म्हणजे दिवाळीचा मनमुराद आनंद घेता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिन्यांपासून आपण सर्वजण कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क व हँड सॅनिटायझर सातत्याने वापरात आहे. आता ही आपली सवयच बनली आहे. सॅनिटायझरमध्ये ज्वलनाला मदत करणारे अल्कोहोलचे प्रमाण असल्याने फटाके वाजवण्यापूर्वी हाताला हँड सॅनिटायझर लावणे जीवावर बेतू शकते. तेंव्हा या दिवाळीत पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेणे गरजेचे आहे. 

गेल्या आठ महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. आता कुठे या महामारीपासून मुक्तता मिळत असल्याचे दिसत आहे. कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढल्यामुळे लोकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे संपला आहे, अशा भ्रमात राहणे तुर्तास तरी परवडणारे नाही. अशातच दिवाळी सारखा मोठा सण साजरा होत आहे. त्यामुळे कोरोनाची टांगती तलवार आजही आपल्या डोक्यावर आहे. कोरोना महामारीमुळे कित्येकांच्या घरातले दीप विजले. काहींना असह्य वेदना देणा-या प्रसंगांना सामोरे जावे लागले. कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली. कित्येकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. कित्येकांच्या कुटुंबांची बसलेली घडी विस्कटली. तेंव्हा सामाजिक अंतर ठेवणारी ही दिवाळी अभूतपूर्व भीतीच्या छायेत साजरी होणारी दिवाळी आहे. याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. फटाक्यातील विषारी वायू कोठेही होम क्वारंटाइनमध्ये राहणाऱ्या रूग्णांसाठी अतिशय प्राणघातक ठरू शकतो.

Diwali Festival 2020 : साताऱ्यात झेंडूचा भाव चारशे पर्यंत जाणार?

आपणा सर्वांनीसुद्धा प्रयत्न केले पाहिजेत की, या वेळी आपण या विषारी धुरामुळे कोणत्याही जीवाला धोका होणार नाही. आपल्या स्वतःच्या शेजारील गावासाठी व शहरासाठी एक उत्कृष्ट काळजी असेल असा निश्चय करणे गरजेचे आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या अहवालानुसार कोरोना कालावधीत फटाक्यांचा धूर प्राणघातक आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये आपले गाव तसेच शहरे धुराने भरण्यापासून वाचवणे गरजेचे आहे.

जगण्यातील दिवाळी! 

फटाके उडवत असाल तर विशेष काळजी घ्या

 • दिवाळीत घरोघरी पणत्या आणि दिवे लावले जातात. हे दिवे लावताना ते कागद, कपडे, लाकूड किंवा ज्वलनशील वस्तूंच्या आसपास तर नाहीत ना, याची खबरदारी घ्यावी.
 • शक्यतो फटाके उडवणे टाळावेच, पण तरीही ते उडवायचेच असल्यास घरापासून दूर मोकळ्या जागेत जाऊन उडवावेत.
 • लहान मुले फटाके उडवत असताना मोठ्यांपैकी कुणीतरी त्यांच्याबरोबर असावे. पायांत चपला घातल्याशिवाय फटाके उडवू नयेत.
 • फटाके उडवायला जाताना बरोबर पाणी किंवा वाळू भरलेली बादली न्यायला विसरू नका. जवळ प्रथमोपचार पेटीही हवीच.
 • अडचणीच्या जागी रॉकेटसारखे फटाके उडवू नका. विद्युत तारांजवळ किंवा घराच्या उघड्या खिडक्यांजवळ फटाके उडवणे धोकादायक ठरू शकते.
 • फटाके उडवताना कपड्यांकडेही लक्ष हवे. अशा वेळी अंगाबरोबर बसणारे आणि शक्यतो सुती कपडेच घाला. घोळदार, नायलॉनचे कपडे फटाके उडवताना नकोत.
 • फुलबाज्या उडवून झाल्यावर त्याच्या काड्या एका बाजूला एकत्र कराव्या. फुलबाजीच्या काड्या धातूच्या असल्यामुळे त्या बराच वेळ गरम राहतात.
 • फटाके उडवून झाल्यावर ते उडवलेले फटाकेही एका बाजूला सारून ठेवावेत.
 • खूप मोठा आवाज सतत कानावर आदळल्यामुळे ऐकू येण्याची शक्ती कमी होणे, उच्च रक्तदाब, हृदयविकार तसेच निद्रानाशासंबंधीचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. अचानक वाढलेल्या ध्वनी प्रदूषणामुळे तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो. ध्वनी प्रदूषण करणारे फटाके न उडवणे आपल्याच हातात आहे.
 • फटाके उडवितांना शक्यतो सुती कपडे वापरावेत. कारण सुती कपडे लवकर पेट घेत नाहीत.
 • गाड्यांजवळ फटाके उडवू नका. कारण, गाड्यांजवळ ऑईल, पेट्रोल सांडलेलं असतं. या वस्तू लगेच पेट घेऊ शकतात.
 • विजेच्या डिपीजवळ फटाके उडवणं टाळा.

शेतकरी सुखावला! लक्ष्मीपुजनाच्या दिवशी साता-यात झेंडूच्या फुलांचा दर वधारणार

फटाके उडवताना दुर्घटना घडलीच तर हे उपाय करा

 • दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जा.
 • भाजलेल्या भागाचा त्रास कमी होईपर्यंत थंड पाण्याखाली धरा.
 • जर जखम गंभीर स्वरूपाची असेल तर घरगुती उपाय करण्याच्या फंदात न पडता दवाखाण्यात जावं.
 • जर कुठे आग लागली असेल तर ती विझविण्यासाठी जाड पोते अथवा जाड चादरीचा वापर करावा.