esakal | Diwali Festival 2020 दीपोत्सवाने उजळला दुर्गेश्वर सज्जनगड; शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली नगरी!
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival 2020 दीपोत्सवाने उजळला दुर्गेश्वर सज्जनगड; शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली नगरी!

आज भल्या पहाटे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, श्री समर्थ महाद्वार तसेच बुरुज तटबंदीला झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करत महाद्वारांपर्यंत मशाली दीपोत्सव साजरा करण्यात आला.

Diwali Festival 2020 दीपोत्सवाने उजळला दुर्गेश्वर सज्जनगड; शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली नगरी!

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : दिवाळीची पहिली अंघोळ अर्थात नरकचतुर्थी दिवशी "एक दिवा शिवरायांच्या चरणी" या संकल्पनेची कास धरून आज श्री दुर्गेश्वर सज्जनगड येथे पहिला दीपोत्सव पहाटे पाच वाजता मशाली पेटवून करण्यात आला. परळी दऱ्याखोऱ्यातील सुमारे दोनशेहून अधिक मावळे मशाली घेऊन सज्जनगडावर दाखल झाले होते. 

भल्या पहाटे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, श्री समर्थ महाद्वार तसेच बुरुज तटबंदीला झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करत प्रेरणामंत्र, नाम जयघोष करून श्री अंगलाई देवी मंदिरापासून धाब्याचा मारुती, श्रीराम मंदिर, समाधी मंदिर, पेठेतील मारूती ते छत्रपती शिवाजी महाद्वारापर्यंत मशाली दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघा सज्जनगड दुमदुमून निघाला होता.

Diwali Festival 2020 मावळ्यांची सज्जनगड मोहीम फत्ते; उद्या दीपोत्सवाने उजळणार गड-किल्ला

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य स्थापनेसाठी सह्याद्रीच्या डोंगररांगावर असलेले सर्व गडकिल्ले आपला इतिहास, आपली संस्कृती स्वाभिमान व अभिमानाने जिवंत दिसून येत आहे. आपण गड-किल्ल्यांची संख्या वाढवू शकत नसलो तरीही त्यांचे सौंदर्य-संवर्धन वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आपल्या वाट्याला जितके गड-किल्ले आहेत ते पुढच्या पिढीला सुस्थितीत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा, असे आवाहन शिवभक्तांनी केले आहे.