Diwali Festival 2020 कष्टाला तोड नाही! मतिमंदांच्या कलाकौशल्याने सातारकर भारावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival 2020 कष्टाला तोड नाही! मतिमंदांच्या कलाकौशल्याने सातारकर भारावले

मतिमंद मुलांनी तयार केलेल्या किटमधील दर्जेदार वस्तूंची एकत्रित किंमत बाजारपेठेतील किमतीपेक्षा कितीतरी कमी आहे. या किटच्या विक्रीतून आलेले पैसे या मुलांच्या शिक्षण व स्वावलंबनासाठी वापरले जातात. नागरिक दर वर्षी ही किट खरेदी करून मुलांच्या कष्टाला सलाम करत असतात.

Diwali Festival 2020 कष्टाला तोड नाही! मतिमंदांच्या कलाकौशल्याने सातारकर भारावले

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : रोटरी क्‍लब सातारा कॅंपच्या आनंदबन मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थी, प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सुंदर आणि सुगंधी दिवाळी किटबरोबर या वर्षी कोरोना किटही तयार केले असून, त्याचे लोकार्पण कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 

दिवाळी व कोरोना किट तयार करण्यात प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष राजीव वाळवेकर, बालक मंदिराच्या अध्यक्षा गीता पाटील यांनी मोलाचे योगदान दिले आहे. किटमध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या अत्तर, उटणे, मेणबत्त्या, रांगोळी, सुगंधी साबण, सुवासिक तेल, परफ्युमसह, लक्ष्मीपूजनाच्या विविध वस्तू असून, त्यांची किंमत 250 रुपये ठेवण्यात आली आहे, तर कोरोना किटही माफक दरात उपलब्ध करू दिले आहे. हे किट डॉक्‍टरांच्या सल्ल्याने तयार केले असून, त्यात आयुष काढा, नस्य तेल, चव्यनप्राश, निम साबण, व्होपोरायझर, ऑक्‍सिमीटर, डिजिटल थर्मामीटर आहे. नागरिकांना याचा चांगला उपयोग होऊ शकेल, असा विश्‍वास रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

Diwali Festival 2020 चायनाला छेद देत भारतीय आकाशकंदिलांनी उजळणार दिवाळी

मुलांनी तयार केलेल्या किटमधील दर्जेदार वस्तूंची एकत्रित किंमत बाजारपेठेतील किमतीपेक्षा कितीतरी कमी आहे. या किटच्या विक्रीतून आलेले पैसे या मुलांच्या शिक्षण व स्वावलंबनासाठी वापरले जातात. नागरिक दर वर्षी ही किट खरेदी करून मुलांच्या कष्टाला सलाम करत असतात. नागरिकांनी यावर्षीही दिवाळी आणि कोरोना किट खरेदी करून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन क्‍लबचे अध्यक्ष राजेंद्र पवार, ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. सुनीता पवार, पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top