महागाईमुळे दिवाळी कडूच; किराणा मालात दहा टक्‍क्‍यांनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागाईमुळे दिवाळी कडूच; किराणा मालात दहा टक्‍क्‍यांनी वाढ

दिवाळी म्हटले, की गोड आणि खमंग पदार्थ हे पाहिजेतच, त्यामुळे झोपडीपासून ते बंगल्यापर्यंत सर्वत्र दिवाळीत पदार्थ तयार केले जातात. सध्याही घरोघरी दिवाळीची तयारी जोरात सुरू आहे. दिवाळीत पहिली खरेदी कपडे व किराणा मालाचीच असते. त्यामुळेच सध्या किराणा दुकानांपुढे ग्राहकांच्या रांगा लागत आहेत.

महागाईमुळे दिवाळी कडूच; किराणा मालात दहा टक्‍क्‍यांनी वाढ

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : कोरोना संकटाने धक्का दिला नाही, असे एकही क्षेत्र नाही. अगदी मंडईपासून दवाखान्यापर्यंत बाजारात कोठेही जा. या धक्‍क्‍याने सर्वच वस्तू, सेवा आणि पदार्थांचे दर वाढले आहेत. त्यातून किराणा माल कसा सुटणार. दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या सर्वच कच्च्या मालाचे दर पाच ते दहा टक्के वाढले असून, खाद्यतेलाने कळस गाठला आहे. मात्र, नागरिकांच्या दिवाळीचा उत्साह काही कमी झालेला. त्यामुळेच किराणा खरेदीसाठी दुकानाबाहेर रांगा लागत आहेत. 

दिवाळी म्हटले, की गोड आणि खमंग पदार्थ हे पाहिजेतच त्यामुळे झोपडीपासून ते बंगल्यापर्यंत सर्वत्र दिवाळीत पदार्थ तयार केले जातात. सध्याही घरोघरी दिवाळीची तयारी जोरात सुरू आहे. दिवाळीत पहिली खरेदी कपडे व किराणा मालाचीच असते. त्यामुळेच सध्या किराणा दुकानांपुढे ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. साखर, पिठीसाखर, रवा, मैद्यासह बहुतेक वस्तूंचे दरी काही प्रमाणात वाढले आहेत. सर्वात जास्त दर वाढले आहेत ते खाद्य तेलाचे. 15 लिटर आणि 15 किलोच्या विविध कंपन्यांच्या तेलाच्या डब्यामागे साधारण 300 ते 400 रुपयांनी दर वाढले आहेत. तर किरकोळीत किलोमागे दहा ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. 

दिवाळी खरेदीसाठी साताऱ्यात दुकानं हाउसफुल्ल; ग्राहकांची ब्रॅंडेड कपड्यांना पसंती

मात्र, सध्या शेंगतेलाचे दर 150 रुपयांच्या पुढे गेले असल्याने त्यास मागणी कमी आहे. मात्र, सर्वात जास्त मागणी सुर्यफूल तेला असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. किराणामालाचे सर्वसाधारण किलोचे दर साखर 36, रवा 30, मैदा 30, पिठीसाखर (लिसा) 75, गुळ 54, खोबरे 180, शेंगदाणा 100 ते 104, हरभरा डाळ 65 ते 70, भाजकी डाळ 120, भाजके पोहे 70 रुपये असे आहेत. दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी आवश्‍यक असलेल्या सुगंधी तेलाच्या बाटल्या, साबण आणि उटणे यामध्येही दहा ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये आयुर्वेदिक उटण्यांनाही जास्त ग्राहक आहेत. मात्र, दर वाढले असले, तरी नागरिक हौसेने खरेदी करत आहेत. 

दिवाळीच्या ताेंडावर कोविड सेंटरच्या 99 कर्मचाऱ्यांची कपात

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 

खरेदीसाठी दुकानांतून ग्राहक वाढले आहेत. मात्र, काही दुकानदारच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेचे नियम पाळताना आढळतात, तसेच काही ठिकाणी दुकानदार ग्राहकांना सूचना देत असतात. मात्र, ग्राहकच खरेदीच्या घाईतून सुरक्षित अंतराच्या नियमाचा बोजवारा उडविताना दिसतात. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top