मिलिटरी अपशिंगे, पुस्तकांचं भिलार माहितीच असेल, मग जाणून घ्या 'टॅक्सीचं गाव'

मिलिटरी अपशिंगे, पुस्तकांचं भिलार माहितीच असेल, मग जाणून घ्या 'टॅक्सीचं गाव'

सातारा : कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे जगाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. कोरोनामुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानही झालं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांना आपापल्या गावी परतावं लागलं. मात्र, याचं कोरोनामुळे एक अनोखे गाव उदयास आलं आहे. मिलिटरीचं गाव,  पुस्तकांचं गाव, फुलांचं गाव, पावसाचं गाव, वडाचं गाव अशी अनेक नावजलेली गाव आपण पाहिली आहेतच; पण आता सातारा जिल्ह्यात 'टॅक्सीचं गाव' म्हणून एक गाव समाेर आले आहे 'जुंगटी'! सातारा पासून 35 किलोमीटर अंतरावर असलेलं आहे गाव.

Good News : आता मध्य रेल्वे धावणार कोकण रेल्वे मार्गावर 

लॉकडाउनमुळे अनेक मजूर पायपीट करत किंवा जसं शक्य आहे तसं मूळगावी परतले. कोणी पायी, कोणी रिक्षा-टॅक्सी, तर कोणी सायकल घेऊन त्यांच्या त्यांच्या गावी परतत आहेत. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना नदीमुळे ७० वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांची जमीन, घरे संपादित झाल्याने विस्थापित झालेल्या जुंगटी गावातील धनगर समाजाचे नागरिक सातारा तालुक्यातील धावली गावाशेजारी स्थायिक झाले. मात्र, पुर्नवसनाचा कोणताच लाभ न मिळाल्याने गावात पाण्याविना खडकाळ माळरानावर शाश्वत शेती पिकवता येत नाही. कोणालाच सरकारी नोकरी मिळाली. मात्र, संपूर्ण गावात फक्त कोकरे भावकीच वास्तव्य करत असून एका पिढीने जिद्दीच्या जोरावर शासकीय आश्रमशाळा बामणोली येथे सातवीपर्यंत तळदेव येथे दहावी पर्यंतचे शिक्षण घेऊन मुंबईमध्ये सुरवातीला मिळेल ती मजुरी करून येण्याऱ्या संकटाशी तोंड देत एकमेकांच्या पाऊलावर पाऊल ठेवत स्वतःचा टॅक्सी व्यवसाय तीस वर्षांपूर्वी सुरु केला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जुंगटी गावात मुंबईच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीच पार्किंग झालं असल्याने मुंबईचं टॅक्सी स्टॅन्ड जुंगटीत पहायला मिळत असून प्रत्येक घराघरात टॅक्सी असल्याने दारादारात टॅक्सी पहायला मिळत आहे, त्यामुळे जुंगटी हे 'टॅक्सीच गाव' म्हणून उदयास येऊ लागलं आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधून 14 गावांची अखेर सुटका!

तीस वर्षांपूर्वी मुंबईमध्ये प्रथम गोंविद कोकरे यांनी फियाट कंपनीची स्वतःची टॅक्सी घेऊन सुरू केलेला व्यवसाय आजही सुरु असून गावातील प्रत्येक घराघरात टॅक्सी आहे. मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हर जुंगटीतील घराघरात पहायला मिळत आहेत. टॅक्सीमुळे गावातील सर्वच ड्राईव्हरना मुंबईचा कानाकोपरा माहीत असून गाल्लाेगल्ली त्यांच्या तोंडपाट झाल्या आहेत. मुंबईत दहा बाय पंधराच्या खोलीत २० ते पंचवीस जण राहुन मुंबईभर केलेल्या टॅक्सी व्यवसायाने गावाच्या कुटुंबाला हातभार लावत आज सत्तर कुटुंब मुंबईत स्वतःची छोटीशी का होईना खोली घेऊन स्थायिक झाले आहेत, तर आता दुसऱ्या पिढीलाही टॅक्सीची भुरळ पडली आहे. आजच्या धावपळीच्या जगात नवनवे तंत्रज्ञान विकसित होत असले तरी, प्रवाशांना ने-आण करण्यासाठी आजही टॅक्सीच उपयुक्त ठरत आहे. 

कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्रात मार्चपासून लॉकडाउन झाले अन मुंबईतील चाकरमान्यांची गावाकडे येण्यासाठी पळापळ सुरु झाली. मात्र, अनेकांना वाहन न मिळाल्याने मुंबईतच अडकून पडावे लागले हाेते. याला अपवाद ठरेल ते जुंगटीतील चाकरमानी. सातारा जिल्ह्यातील बहुतांश गावांत जुंगटीकरांच्या टॅक्सीची मदत झाली. 

सातारकरांनाे... कुटुंबाचे, समाजाचे रक्षण करण्यासाठी हे करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह

गेल्या सहा महिन्यांपासून टॅक्सीची चाके स्थिरावल्याने टॅक्सीवर अवलंबुन असणाऱ्या कुटुंबांची मात्र रोजगाराविना वाताहत झालेली आहे. काही जणांनी पुन्हा मुंबईचा रस्ता धरला परंतु कोरोनामुळे टॅक्सी घेऊन मुंबईत जाणे धाेकादायक असल्याने काहींनी अद्याप गावात राहणेच पसंत केले आहे. दरम्यान गावात रोजगार मिळत नसल्याने बहुतांश टॅक्सीचालकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. सध्या गावातील स्टॅन्डवर टॅक्सींच वाहनतळ बनलं असून दारादारात टॅक्सी पहायला मिळत असल्याने 'टॅक्सीच जुंगटी गाव' म्हणून नावारूपास येत आहे.

शिवेंद्रसिंहराजे... पक्षांच्या नेत्यांपुढे गोंडा घोळणे बंद करा

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com