साता-यातील खंडोबाचा माळ परिसरातील डॉक्‍टरांनी केली आत्महत्या

गिरीश चव्हाण
Sunday, 17 January 2021

याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली असून, तपास हवालदार गुलाब जाधव करीत आहेत.

सातारा : येथील संभाजीनगरमधील खंडोबाचा माळ परिसरात राहणाऱ्या डॉ. दिगंबर रघुनाथ पवार (वय 56) यांनी घरातील ओपीडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली, याची माहिती समजू शकली नाही. संभाजीनगरमधील खंडोबाचा माळ परिसरातील प्लॉट नंबर 48 मधील बंगल्यात डॉ. दिगंबर पवार हे पत्नी दीपाली यांच्यासमवेत राहण्यास होते. 

डॉ. दिगंबर यांनी बंगल्याच्या एका खोलीत ओपीडी सुरू केली होती. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ते ओपीडीत गेले. बराच वेळ झाले तरी आतून हालचाल न जाणवल्याने दीपाली या त्याठिकाणी गेल्या. या वेळी त्यांना डॉ. दिगंबर यांनी ओपीडीतील स्लॅबच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. 

साताऱ्यातील वाहतुकीत सोमवारी बदल; मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाचा निर्णय 

याची माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. डॉ. दिगंबर यांनी आत्महत्या का केली, याची माहिती समजू शकली नाही. याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली असून, तपास हवालदार गुलाब जाधव करीत आहेत. 

मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही; वाराणसीत जाऊन लढण्याची ताकत माझ्यात आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Digamber Pawar From Sambhajinagar Died Satara Marathi News