कोरोनाच्या लढाईत लोणंदच्या डॉक्‍टरांची रात्रंदिवस सेवा... 

रमेश धायगुडे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

सावित्री हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी समर्पित हेल्थ केअर सेंटरमध्ये सेवा देण्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लोणंद-नीरा शाखेचे सुमारे 25 डॉक्‍टर रात्रंदिवस सेवा देणार आहेत, असे जिल्हा कोरोना समन्वय समितीचे प्रतिनिधी डॉ. नितीन सावंत यांनी सांगितले. 

लोणंद (जि.सातारा) : येथील सावित्री हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी समर्पित हेल्थ केअर सेंटरमध्ये सेवा देण्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लोणंद-नीरा शाखेचे सुमारे 25 डॉक्‍टर रात्रंदिवस सेवा देणार आहेत, असे जिल्हा कोरोना समन्वय समितीचे प्रतिनिधी डॉ. नितीन सावंत यांनी सांगितले. 

येथे सावित्री हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी सुरू केलेल्या समर्पित हेल्थ केअर सेंटरच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, लोणंद व परिसरातील बाधित रुग्णांना चांगले उपचार देण्यासाठी आयएमएचे आम्ही सर्व डॉक्‍टर्स कटिबध्द आहोत. आयएमएचे सर्व डॉक्‍टर्स कोरोना विरुद्धच्या या लढाईत जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर, प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, तहसीलदार दशरथ काळे, मुख्याधिकारी हेमंत ढोकळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत. अन्य आवश्‍यक बाबीही येथे आयएमएच्या माध्यमातून पुरवल्या जाणार आहेत. 

सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या माध्यमातून येथे पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. या वेळी सावित्री हॉस्पिटलचे डॉ. संजय शिवदे, आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. दीपक पवार, डॉ. रोहन रावखंडे, डॉ. अनिलराजे निंबाळकर, डॉ. मिलिंद काकडे, डॉ. दीपक गायकवाड, डॉ. मकरंद डोंबाळे, डॉ. उमेश साळुंखे, डॉ. नानासाहेब हाडंबर, डॉ. स्वाती शहा, डॉ. विद्याधर शिवदे व सदस्य डॉक्‍टर्स उपस्थित होते. 

संपादन - सुस्मिता वडतिले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors from the Indian Medical Association in Lonand village will be working day and night in Corona