माणच्या राजकारणात गोरे बंधूंचं वर्चस्‍व

Gore Brothers
Gore Brothersesakal

दहिवडी (सातारा) : जिल्हा परिषद गट आंधळी (Zilla Parishad Group Andhali) (ता. माण) हा गट संवेदनशील होय. आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांचा बालेकिल्ला समजला जाणार हा गट मागील निवडणुकीमध्ये स्वतःकडे खेचून आणण्यामध्ये शिवसेनेचे नेते शेखर गोरे (Shivsena leader Shekhar Gore) यांनी यश मिळवले. पण, त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे या गटात आंधळी कोशिंबीर सुरू आहे. मात्र, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पवार (Zilla Parishad Member Babasaheb Pawar) यांचा विकासकामांच्या माध्यमातून गावागावांत पोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Dominance Of Gore Brothers Over Zilla Parishad Andhali Group In Maan Taluka Satara Political News)

Summary

माणच्या राजकारणात गोरे बंधूंचे आगमन झाल्यानंतर या गटाने सर्वांचे लक्ष वेधले. या गटातील विजयानेच आमदार गोरे व शेखर गोरे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

पूर्वाश्रमीचा महिमानगड व आता आंधळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गटाचे नेतृत्व (कै.) सदाशिवराव पोळ, आमदार गोरे, अर्जुन काळे यांसारख्या मातब्बरांनी केले आहे. या गटावर शिवसेनेने भगवा फडकविण्यात यश मिळवले होते. माणच्या राजकारणात गोरे बंधूंचे आगमन झाल्यानंतर या गटाने सर्वांचे लक्ष वेधले. या गटातील विजयानेच आमदार गोरे व शेखर गोरे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढताना शेखर गोरे यांनी आंधळी गटासह आंधळी व मलवडी पंचायत समिती गण आमदार गोरे यांच्याकडून खेचून आणण्यात यश मिळवले. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पुन्हा पुलाखालून बरेच पाणी गेले. आमदार गोरे काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये (BJP) गेले तर शेखर गोरे हे राष्ट्रवादीतून (NCP) शिवसेनेत गेले. पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर व कविता जगदाळे यांनी शेखर गोरेंना साथ दिली तर जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पवार यांनी ‘एकला चलो रे चा’नारा दिला.

Gore Brothers
घाईगडबडीने निर्णय घेऊ नका; रामराजेंचा 'आमचं ठरलंय' ला सल्ला

श्री. पवार यांनी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून मोठा निधी खेचून आणण्यावर भर दिला. त्यांनी नवीन अंगणवाडी, शाळा, सभामंडप, स्मशानभूमी, रस्ते तयार केले. अंगणवाडी, शाळा व रस्ते दुरुस्ती आदी कामे केली. गटातील जवळपास प्रत्येक गावात त्यांनी किमान एक तरी विकासकाम करण्यात यश मिळवले आहे. कासारवाडी येथे त्यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या पुलाला उत्कृष्ट पूल म्हणून गौरविण्यात आले आहे. कोविड काळात त्यांचे कार्य ठळकपणे उठून दिसले. मलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र असो, वा दहिवडीतील कोरोना केअर सेंटर जिथे जिथे जी जी शक्य आहे, ती मदत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्रास नवीन रुग्णवाहिका उपलब्ध केली. अनेक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर, खाऊचे वाटप केले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झालेले दुर्योधन सस्ते हे निवडणुकीनंतर गटात फिरकलेसुध्दा नाहीत. कविता जगदाळे यांच्या रूपाने या गटातील आंधळी गटाला सभापतिपदाचा मान मिळाला आहे. जगदाळे व विजयकुमार मगर या पंचायत समिती सदस्यांनी छोट्या-छोट्या नागरी सुविधांवर तसेच अंगणवाडी, शाळा दुरुस्‍ती करण्याकडे लक्ष दिले.

Gore Brothers
'खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक; कऱ्हाडच्या नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा'

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी मला मोलाची साथ दिली. त्यामुळेच मी जिल्हा परिषदेतून सर्वांत जास्त निधी मिळवण्यात व गटातील गावागावांत विकासकामे करण्यात यशस्वी झालो आहे.

-बाबासाहेब पवार, सदस्य, जिल्हा परिषद

"आंधळी गट पक्षांतर व राजकीय बजबजपुरीमुळे विकासापासून दूर राहिला आहे. या गटात कोणतेही ठोस काम झाले नाही."

-अर्जुन काळे, माजी सदस्य, जिल्हा परिषद

Dominance Of Gore Brothers Over Zilla Parishad Andhali Group In Maan Taluka Satara Political News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com