Senior thinker Dr A H Salunkhe reflects on social welfare, the relevance of reformers’ ideas and the importance of peace and compassion.
esakal
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे आज (बुधवार) वयाच्या ८५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाकडून त्यांना नुकताच मानद डी. लिट पदवी देण्यात आली. त्यानिमित्त डॉ. साळुंखे यांच्याशी साधलेला संवाद...
विद्यापीठाने केलेल्या सन्मानाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता?
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाने डी. लिट ही मानद पदवी देऊन माझा गौरव केला. त्याचा अर्थतिथे मला आनंद आहे. तरीही एका मोठ्या मानाने मला जाणवले आहे आणि ती म्हणजे जो गौरव आ. ह. साळुंखे या व्यक्तीचा नाही, तर मी आयुष्यभर जी भूमिका घेतली, जे विचार मांडले, इतिहासाच्या जे भाष्य केले, त्या सर्व गोष्टींना मान्यता देण्याचा भाग म्हणून मी या गौरवाकडे पाहतो. माझ्या कार्याची अशी दखल घेऊन मला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी विद्यापीठाचे कुलगुरू समन्वयक अध्यक्ष व इतर सर्व सहकारी यांच्या हृदयापासून आभार मानतो. विद्यापीठाची मी अत्यंत कृतज्ञ आहे. या पदवीमुळे माझ्यावर एक जबाबदारीही आलेली आहे. यापुढे मी समाजहिताची भूमिका घ्यावी. ही ती जबाबदारी आहे आणि मी माझ्यापरीने ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करेन.