
कऱ्हाड : राज्यात नवीन उद्योगधंदे यायला इच्छुक असून, त्या उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्धीसाठी राज्यात स्वतंत्रपणे मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण विभाग सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून, त्याबाबत सकारात्मकता दर्शविल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभेत आज दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन ठरावावर ते बोलत होते.