
सातारा : राईट टू लिव्ह आणि राईट टू व्हॅल्यू या घटनेने दिलेल्या हक्कानुसार पालिका प्रशासनास माजगावकर माळ येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित करताना त्यांना पुन्हा येथेच हक्काचा निवारा देणे, तसेच स्थलांतरित जागेत सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देणे क्रमप्राप्त आहे. हे लोक जर येथे बेकायदेशीररीत्या राहात आहेत, असे ग्राह्य धरले, तर त्यांचे मतदान तुम्हाला कसे चालले? त्यामुळे प्रशासनाने घरकुलांमध्ये रहिवाशांना अग्रक्रमाने जागा द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी प्रशासनास दिला आहे.