esakal | नाद नाय करायचा! माजी आमदारांच्या लढ्याला आले यश

बोलून बातमी शोधा

नाद नाय करायचा! माजी आमदारांच्या लढ्याला आले यश}

मायणीलाही 24 बाय 7 ही योजना लवकरच सुरू होणार आहे. मायणी शिवारात आलेल्या पाण्याचे पूजन सरपंच सचिन गुदगे, नीता गुदगे, पल्लवी गुदगे, आशा माने, विद्या काबुगडे, सुशीला खलिपे आदी महिलांच्या हस्ते ओटीभरणाने करण्यात आले.

satara
नाद नाय करायचा! माजी आमदारांच्या लढ्याला आले यश
sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : मायणीच्या शिवारात अखेर टेंभू योजनेचे पाणी खळाळल्याने परिसरातील ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या लढ्याला यश आले असून, टेंभू योजनेतून पाणी मायणीच्या ब्रिटिशकालीन तलावाकडे रवाना झाले.
 
टेंभू योजनेचे पिण्यासाठी पाणी मिळावे, याचा डॉ. येळगावकर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या भागाला टेंभू योजनेतून खास बाब म्हणून पिण्याचे पाणी देण्याची मागणी तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. त्यानुसार तत्कालीन मंत्री पाटील यांनी खास बाब म्हणून आपल्या टंचाई विभागातून सव्वापाच कोटी निधी या योजनेला मंजूर करून दिला. या योजनेतून 16 गावांना फायदा होणार असून, आगामी काळात ही योजना शेतीसाठी उपयोगी होणार आहे. मायणीलाही 24 बाय 7 ही योजना लवकरच सुरू होणार आहे. मायणी शिवारात आलेल्या पाण्याचे पूजन सरपंच सचिन गुदगे, नीता गुदगे, पल्लवी गुदगे, आशा माने, विद्या काबुगडे, सुशीला खलिपे आदी महिलांच्या हस्ते ओटीभरणाने करण्यात आले.
 
सचिन गुदगे म्हणाले, ""टेंभूच्या पाण्यासाठी आम्ही चातकाप्रमाणे वाट पाहात होतो. डॉ. येळगावकर आणि आम्ही त्यासाठी लढा दिला. या लढ्याला यश आलेले पाहून समाधान वाटते, हे पाणी शेतीसाठी कसे वापरता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.'' कार्यक्रमास मानसिंगराव देशमुख, सरपंच संपत शेवाळे, उपसरपंच आनंदा शेवाळे, सूरज पाटील, जगन्नाथ भिसे, विजय कवडे, पिंटू झोडगे, आशा माने, सुधाकर शिंदे, सुखदेव शिंदे, तुषार भिसे, गणीभाई सर्वान, विजयराव कवडे, अंकुश निकाळजे, नंदकुमार पुस्तके, राजू ठोंबरे, विलास शिंदे, महादेव ढवळे, दत्तात्रय थोरात, मस्जीदभाई नदाफ आदी उपस्थित होते. राजूरकर कचरे यांनी आभार मानले. 

मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही हेच पालिकेत आहे सुरु

Edited By : Siddharth Latkar