अपहरणकर्त्यांनी सरपंच पतीस माळशिरस तालुक्यातील पेट्रोल पंपावर दिले साेडून

अपहरणकर्त्यांनी सरपंच पतीस माळशिरस तालुक्यातील पेट्रोल पंपावर दिले साेडून

म्हसवड (जि. सातारा) : पानवण (ता. माण) येथील अपहरण झालेले डॉ. नानासाहेब शिंदे यांना सातारा - पंढरपूर रस्त्यावरील तांदूळवाडी (ता. माळशिरस) येथील पेट्रोल पंपावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी सोडले. याबाबतची माहिती स्वतः डॉ. शिंदे यांनी पोलिसांना दिली.
 
म्हसवड पोलिसांनी तांदूळवाडी (ता. माळशिरस) येथून त्यांना ताब्यात घेतले असून, पोलिस बंदोबस्तात म्हसवड पोलिस ठाण्यात आणले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

सोसायटी ठरावावरून राडा; राजकारणातील गुन्हेगारी मोडण्यात प्रशासन कुचकामी
 
दरम्यान, शनिवारी रात्रीपासून शिंदे यांचे अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिली होती. यानुसार अज्ञातांवर अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. डॉ. शिंदे यांच्या शोधासाठी विविध भागांत पोलिस पथके पाठवली होती. हे अपहरण जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी सोसायटी गटातून डॉ. शिंदे यांच्या नावाचा ठराव केल्याच्या कारणावरून अज्ञातांनी केल्याची चर्चा तालुक्‍यात होती. दरम्यान, पोलिसांनी डॉ. शिंदे यांची जळालेल्या अवस्थेतील कार जप्त केली आहे. 

पानवण येथे डॉ. नानासाहेब शिंदे हे राहण्यास असून, त्यांची पत्नी जयश्री या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, पानवण येथील विकास सेवा सोसायटीतून डॉ. नानासाहेब शिंदे यांच्या नावाचा ठराव काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. शनिवारी (ता. 27) डॉ. शिंदे हे चारचाकीतून गावाजवळ असणाऱ्या शेतात गेले होते. रात्री आठ वाजले तरी ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली. शेताजवळील पुलावर डॉ. शिंदे यांची चारचाकी उभी असल्याचे कुटुंबीयांना दिसले. त्यांनी जाऊन पाहिले असता, चारचाकीतील पाठीमागील सीट अर्धवट जळाल्याचे, तसेच पुढील सीटजवळ शिंदे यांची एक चप्पल पडल्याचे दिसले. यामुळे घाबरलेल्या शिंदे यांच्या कुटुंबीयांनी शेतात शोध घेतला. मात्र, डॉ. शिंदे यांचा मागमूस लागला नाही.

मैदानावर अन्‌ मैदानाबाहेरही परिस्थितीशी दोन हात करत बाळू वाढवतोय देशाचा नावलौकिक

यानंतर कुटुंबीयांनी ग्रामस्थांना माहिती दिली. डॉ. शिंदे यांचे अपहरण झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळाल्यानंतर म्हसवड पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले होते. घटनास्थळाची पाहणी करत त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकारी त्याठिकाणी दाखल झाले. यानंतर डॉ. शिंदे यांच्या शोधासाठी विविध भागांत पथके रवाना करण्यात आली होती. रात्रभर राबविलेल्या शोधमोहिमेत डॉ. शिंदे यांचा कोणताही ठावठिकाणा पोलिसांना लागला नाही. 

रविवारी सकाळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक नीलेश सूर्यवंशी यांनी घटनास्थळाची पाहणी करत तपासाच्या सूचना अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. अपहृत डॉ. शिंदे यांच्या शोधासाठी स्थानिक पोलिस ठाण्याची, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके विविध भागांत फिरत होती. जिल्हा बॅंक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, माण तालुक्‍यातील सोसायटींचे ठराव घेण्याच्या कारणावरून वातावरण तापले होते. ठराव आपल्या बाजूने व्हावा, यासाठी सर्वच बाजूंनी सर्व शक्‍यतांचा वापर मुक्‍त हस्ताने मध्यंतरीच्या काळात झाला होता. याच काळात पानवण सोसायटीतून डॉ. शिंदे यांच्या नावाचा ठराव झाला. ठरावानंतर डॉ. शिंदे यांच्यावर अनेक जणांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला ते बळी पडले नव्हते. या कारणावरूनच डॉ. शिंदे यांचे अपहरण झाल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे. याचा तपास म्हसवडचे सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे करीत आहेत. पानवण (ता. माण) येथील अपहरण झालेले डॉ. नानासाहेब शिंदे यांना सातारा - पंढरपूर रस्त्यावरील तांदूळवाडी (ता. माळशिरस) येथील पेट्रोल पंपावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास अपहरणर्त्यांनी सोडले. याबाबतची माहिती स्वतः डॉ. शिंदे यांनी पोलिसांना दिली.

सातारकरांनाे! कास जलवाहिनीस लागली गळती; पाणी काटकसरीने वापरा

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com