पेटंट मिळवलेल्या संशोधनाच्या मुख्य अंशांमध्ये, मानवी मूत्रातून कार्बन नॅनो मटेरिअल तयार करणे, तसेच त्याचा वापर ऊर्जा निर्माण करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो.
कलेढोण : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील (Swami Ramanand Teerth Marathwada University) संशोधक प्रा. डॉ. राजाराम माने (Researcher Prof. Dr. Rajaram Mane) आणि डॉ. झोयेक शेख यांच्या टीमने एक महत्त्वपूर्ण शोध लावण्यात यश मिळवले आहे. ज्यामुळे मानवी मूत्रापासून (Human Urine) कार्बन पदार्थाची निर्मिती करून याच कार्बन पदार्थाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. या संशोधनाला अमेरिकन पेटंट प्राप्त झाले असून, हे पेटंट स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्राप्त झाले आहे.