
रेठरे बुद्रुक : उसाचा रिकामा ट्रॅक्टर ओढ्यावरील पुलावरून पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला. रेठरे खुर्द येथे मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. संतोष दत्ता जाधव (वय २५, मूळगाव जालना जिल्ह्यातील असून, सध्या रा. कोकरूड तर्फ माळेवाडी, ता. शिराळा) असे मृताचे नाव आहे.