
वाई : दारु पिताना झालेल्या चेष्टा मस्करीच्या वादातुन दोन मित्रांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. रात्री साडेबारा ते अडीज वाजण्याच्या सुमारास आंबेडकरनगर ( सोनगिरवाडी ) येथील बांभुळवन नावाच्या रिकाम्या जागेत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. दरम्यान या घटनेने वाई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.