

मलकापूर : महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी येथे घडला. सुदैवाने महिला आणि बाळ सुखरूप आहेत. परंतु वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना अपयश आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर महिलेवर आलेला प्रसंग सुदैवाने टळल्याने अनेकांनी सुस्काराही टाकला.