पृथ्वीच्या पर्यावरणाचे भाग Earth Environment Children noticed that environment earth mainly | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वी

पृथ्वीच्या पर्यावरणाचे भाग

बालमित्रांनो आपल्या लक्षात आले असेलच की पृथ्वीचे पर्यावरण हे मुख्यतः तीन भागांचे बनलेले आहे. एक पृथ्वीच्या आवरणाच्या वरील भागात असलेले वायू, दोन पृथ्वीचे कवच किंवा आवरण. पृथ्वीचे कवच हे ७१ टक्के पाणी व २९ टक्के जमीन या स्वरूपात मुख्यत्वे आहे. आपली सारी जीवसृष्टी या तिन्ही भागात आहे.

जमीन, पाणी आणि हवा. तिसरा पर्यावरणाचा भाग म्हणजे या आवरणाच्या आत असलेल्या गाभ्यात उकळत्या तप्त स्वरूपात असलेला लाव्हारस की जो द्रवरूप आहे. कधी कधी तो टणक कवच फोडून बाहेर पृथ्वीच्या पृष्ठभागावरही भागावरही पसरतो.

त्यालाच आपण ज्वालामुखीचा उद्रेक झाला असे म्हणतो. या वातावरणाच्या पलीकडे ही पर्यावरण आहे असे आपण म्हणू शकतो. कारण सूर्याभोवती फिरताना पृथ्वी आणि पृथ्वी भोवती फिरणारा चंद्र यांच्याही परस्परांविषयीच्या असणाऱ्या गुरुत्वाकर्षणातून आणि सूर्यापासून निघणाऱ्या उष्णतेतून पृथ्वीवरच्या पर्यावरणावर परिणाम होत असतो.

त्यातूनच पृथ्वीवर आपण वेगवेगळे ऋतुमान म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अनुभवतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्या कक्षेतील फिरण्यावर आणि त्यात बदलत असलेल्या अंतरामुळेही वेगवेगळ्या तापमानांचा अनुभव येतो. दोन्ही ध्रुव तुलनेने सूर्यापासून जास्त अंतरावर असल्यामुळे तिथे नेहमीच थंड हवामान असते व बराच प्रदेश बर्फाच्छादित असतो.

तसेच विषुववृत्ताच्या जवळ असणारे प्रदेश जास्त उष्ण असतात. याशिवाय समुद्रात असणारे निरनिराळे उष्ण आणि थंड प्रवाह ही पर्यावरणावर परिणाम करत असतात. याशिवाय एक सर्वांत मोठा घटक जो पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत असतो तो म्हणजे मनुष्य. जंगल तोड, कारखाने, रस्ते, धरणे,

कोळशापासून आणि तेलापासून वीज निर्मिती व व अगणित संख्येने असलेल्या वाहनांचा वापर, या व इतर गोष्टीतून होणारे पर्यावरणाचे वाढते प्रदूषण आणि असंतुलन. त्यातून उद्‍भवणारे भयावह परिणाम. पर्यावरणाच्या सर्व अंगांचा विचार करून पृथ्वीची विनाशाकडे चालली वाटचाल रोखू शकतो का?