कराड जनता बँकेच्या कर्ज व्यवहारांची ईडीकडून चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED inquiry into loan transactions of Karad Janata Bank

कराड जनता बँकेच्या कर्ज व्यवहारांची ईडीकडून चौकशी

कऱ्हाड - नेहमीच चर्चेतील कराड जनता सहकारी बॅकेच्या कारभाराची प्रवर्तन निदेशालय म्हणजे ईडीतर्फे सखोल चौकशी सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दोन वर्षापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने जनता बँकेचा परवाना रद्द तर सहकार खात्याने बॅंकेची दिवाळखोरी एकाच दिवशी जाहीर केली होती. केवळ चार कर्जदारांच्या मोठ्या कर्जाने बँकेवर दिवाळखोरी लादल्याची आजही भावना आहेत. त्या अऩुशंगाने ईडीकडूनही त्या चार मोठ्या कर्ज व्यवहारांची चौकशी सुरू आहे.

बँकेच्या मुख्य कार्यालयात ईडीच्या अधिकारी दिवसभर ठाण मांडून होते. बँकेच्या कर्ज व्यवहारांची चौकशी केली. तीन दिवसापूर्वी अवसायानिक मनोहर माळी यांच्याकडेही ईडीने कर्ज वसुलीच्या सध्यस्थितीचा अहवाल मागवला आहे. ईडी कार्यालयात तत्पूर्वी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सुर्यवंशी यांच्याकडेही तब्बल दहा तासाहून अधिक काळ चौकशी झाली आहे.

कराड जनता बँकेच्या बिहिशोबी कर्ज वाटपासह त्याची मजुंरीही ईडीच्या कचाट्यात आहे. त्या चार कर्जदारांच्या थकीत कर्जाची रक्कन ५०० हून कोटींच्या आसपास आहे, बॅकेने ती रक्कमच वसूल केलेली नाही. चारपैकी दोघांना विनातारण कर्जे दिल्याने त्या विरोधात चौकशी सुरू आहे. त्यामुळे कर्ज देण्याची मर्यादांच्या पालनाच्या नियमांना डावलून कर्ज वाटल्याने ईडीकडे तक्रार दाखल ली. त्यापूर्वी त्याबाबत सहकार खात्यासह कऱ्हाडच्या न्यायालयात बँकेचे सभासद आर. जी. पाटील यांनी ३१० कोटींच्या अपहाराची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अपहाराचा गुन्हा दाखल होवून त्याची पोलिस चौकशी सुरू आहे. त्याच काळात बॅंकेची दिवाळाखोरी जाहीर झाल्याने सर्व व्यवहार चौकशीच्या रडारवर आले होते.

ईडीकडेही त्या व्यवहाराच्या चौकशीची तक्रार दाखल झाली. त्यानुसार ईडीकडून चौकशी सुरू आहे. कराड जनता बॅंकेची स्थापना १९६२ ची तर बॅक परवाना त्यांना १९८६ चा आहे. अत्तापर्यतच्या टप्प्यात १९९० नंतर होणारा कारभार अधिक चर्चैचा ठरला. संचालक मंडळांच्या कारभाऱ्यांचा बेफीकरपणामुळे कर्जे थकत गेली. मोठ्या कर्जाच्या रक्कम एकाच दमात मंजूरीची पद्दतही बॅकेला गोत्यात आणणारी ठरली. ईडीकडे तक्रार दाखल झाली. त्यासंदर्भात मोठ्या कर्जांची बोगस कागदपत्रे, नियमबाह्य आणि विनातारण कर्ज झाले. त्यामुळे अवैध व्यवहार अधोरेखीत झाले. त्यात गैरप्रकार असल्याचे स्पष्ट झाल्याने ईडीने चौकशी सुरू केली आहे.

कराड जनताच्या चारच कर्जदारांच्या थकीत कर्जे किती, वसुली किती झाली, तारण काय आहे, या सगळ्याची चौकशी होत आहे. उद्योजकांना विनातारण तर कारखानदारांनाही मोठी कर्जे दिली आहे, त्चौया सगळ्याची चौकशी सुरू आहे. त्यासाठी ईडी कार्यलायकडून काही अधिकारी आज दिवसभर शहरात दाखल झाले होते. त्यांची चौकशी सुरू होती. जनत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही चौकशी सुरू आहे. त्याची दहा तासापेक्षाही जास्त काळ चौकशी झाली आहे.

कराड जनता बँकेच्या कर्ज व्यवहरांची ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. त्यानुसार अवसायानिक म्हणून माझ्याकडून त्या कर्ज कशी वितरीत केली, यासह त्या व्यवहारांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यानुसार त्यांनी व्यापक अहवाल मागविला आहे. ता लवकरच ईडीला देण्यात येणार आहे.

- मनोहर माळी, अवसायानिक, कराड जनता सहकारी बँक.

Web Title: Ed Inquiry Into Loan Transactions Of Karad Janata Bank

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..