
शिक्षण विभागाचा साता-यातील शाळेस झटका; मान्यता केली रद्द
सातारा : बालकांचा माेफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 मधील तरतुदीनूसार सातारा जिल्ह्यातील लेडीज एज्युकेशन साेसायटी, सातारा संचलित सराह लिना स्कूल या शाळेची मान्यता रद्द करण्यात येत असल्याचे आदेश काढण्यात आला आहे. या शाळेची मान्यता रद्द करण्यात येत असल्याने या संस्थेमधील विद्यार्थ्यांचे प्रचलित नियम व निषकानुसार नजीकच्या शाळेत समायाेजन करण्यात यावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. (education-department-cancelled-school-permission-from-satara-not-following-rte-guideliness)
संबंधित शाळेस तक्रारींच्या अनुषंगाने खुलासा सादर करण्याबाबत कळविले हाेते. संस्थेने सादर केलेला खुलासा असमाधानकार असल्याने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी शाळेची चाैकशी करण्याकरीता तपासणी समिती गठीत केली हाेती.
हेही वाचा: Covid Impact : कोल्हापूर, साताऱ्याला जाणाऱ्या कर्नाटकच्या गाड्यांना 'ब्रेक'
संबंधित तपासणी समितीने अहवालात केलेली शिफारस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचा अहवालातील शिफारस व शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांनी केलेल्या शिफारशींनुसार साता-यातील लेडीज एज्युकेशन साेसायटी सातारा संचलित सराह लीना स्कूलची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश शासनाने नुकताच काढला आहे अशी माहिती शिक्षण विभागातून (प्राथमिक) देण्यात आली आहे.
हेही वाचा: लाखमोलाच्या ‘कोल्हापुरी’चे उत्पादन घटले; लाखाेंचा फटका