
कोरेगाव : दहावी-बारावीनंतर काय? विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे, हे समजून घेण्यासाठी शिक्षण विभागातर्फे कलचाचणी (अभिरुची कसोटी) घेतली जात होती; परंतु चार वर्षांपासून कलचाचणी बंद आहे. परिणामी, पालक आणि विद्यार्थ्यांना पर्याय निवडण्यात अडचणी येत आहेत. खासगी संस्थांकडून कलचाचणी करून घेण्याचा खर्च सर्वसामान्य पालकांना परवडणारा नाही. त्यामुळे शासनानेच कलचाचणी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.