आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय घेतला, याची नोंद देशानं घेतली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

राज्यात, देशात चार महिन्यापुर्वी आम्ही इतिहास घडवला आहे, त्यात माझ्या सर्व ५० सहकाऱ्यांबरोबर शंभुराज देसाई हेही आघाडीवर होते.

Eknath Shinde : आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय घेतला, याची नोंद देशानं घेतली

कऱ्हाड - राज्यात, देशात चार महिन्यापुर्वी आम्ही इतिहास घडवला आहे, त्यात माझ्या सर्व ५० सहकाऱ्यांबरोबर शंभुराज देसाई हेही आघाडीवर होते. अन्याय लवकर दुर झाला पाहिजे, लवकर काय ते करा असे ते म्हणायचे. पुढे काय होईल याची पर्वा न करता हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेवुन आम्ही पुढे गेलो. आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे. त्याची नोंद राज्यातील सर्व जनतेने घेतली आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मंत्री देसाई यांच्या वाढदिनी आयोजीत कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याकडुन शंभुराज यांनी समाजसेवेच धडे घेतले. त्यांच्या आई-वडीलांचे आशिर्वाद घेवुन त्यांनी चांगले काम केले. त्यांचा उत्कृष्ट संसदपटु म्हणुनही गौरवण्यात आले आहे. त्यामुळे लोकांचा नेता म्हणुनही ते नावारुपास आले आहेत. लोकांना मदत करण्यात ते आघाडीवर असतात. त्यांनी कोरोना, महापुरासह अन्य कोणत्याही संकटात त्यांनी लोकांना न्याय देण्याचे काम केले.

आम्ही चार महिन्यापुर्वी या राज्यात, देशात इतिहास घडवला आहे, त्यात माझ्या सर्व ५० सहकाऱ्यांबरोबर शंभुराज देसाई आघाडीवर होते. ते अन्याय लवकर दुर झाला पाहिजे, लवकर काय ते करा असे म्हणायचे. जे काही घडले, त्याच्या खोलात मी जात नाही. हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेवुन आम्ही पुढे गेलो. पुढे काय होईल याची पर्वा आम्ही केली नाही. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहुन परिणामांची पर्वा न करता काम करणारा कार्यकर्ता म्हणुन शंभुराज देसाई हे मला मनापासुन भावतात. त्यामुळे माझे प्रेम त्यांच्यावर आहे. त्यांचेही प्रेम माझ्यावर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचेही प्रेम शंभुराजेवर आहे. मी माझ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मी शंभुराज देसाईंना दिले आहे. आम्ही घेतलेला निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व घटकांसाठी मी, देवेंद्र फडणवीस व आम्ही सर्व सहकारी काम करत आहोत. त्याची नोंद राज्यातील सर्व जनतेने घेतली आहे.

शंभुराज देसाईंवर चित्रपट काढू

शंभुराज देसाईंच्या कामास वाटचालीवर आधारीत चित्रपट काढण्यासाठी मी त्यांना चांगला अभिनेता सुट होईल, चांगली भुमिका करेल असे अभिनेता शोधणार आहे, असे सांगुण मुख्यमंत्री म्हणाले, मी धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे हा अनंत दिघे यांच्यावर आधारीत चित्रपट काढला आहे. त्यामुळे मला चित्रपट काढण्याचा अनुभव आहे. त्यात आमदार शहाजीबापु पाटलांनाही रोल द्यावा लागेल, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.