Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा शेतशिवारात फेरफटका; विविध पिकांची पाहणी
Satara News : नागपुरातील हिवाळी अधिवेशन, मंत्रिमंडळाचे खाते वाटप आदींच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळगावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळेस शिंदे यांनी स्वत: कच्च्या रस्त्यांवरून गोल्फकार चालवत प्रवास केला.
कास : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालपासून त्यांच्या दरे (ता. महाबळेश्वर) गावात मुक्कामी आहेत. मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी वेळ मिळतो, त्या वेळी ते गावातील शेतीत रमतात. शेतात जाऊन बांबू, चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी शिंदेंनी केली.