Krishna Factory Election : 'कृष्णा'चा बिगूल 19 मेपासून?; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा प्रस्ताव

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल 19 मे रोजी वाजण्याची शक्‍यता आहे.
Krishna Sahakari Sugar Factory
Krishna Sahakari Sugar Factoryesakal

कऱ्हाड (सातारा) : शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या (Krishna Sahakari Sugar Factory) पंचवार्षिक निवडणुकीचा (Election) बिगूल 19 मे रोजी वाजण्याची शक्‍यता आहे. कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर (Election Officer Prakash Ashtekar) यांनी प्राधिकरणाला दिलेल्या प्रस्तावात त्या तारखेपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी केली आहे. 19 मेनुसार कार्यक्रम जाहीर झाल्यास मतदान 26, तर 28 जूनला मतमोजणीही होण्याची शक्‍यता आहे. निवडणूक निर्णय प्राधिकरणाने अद्याप त्यावर निर्णय दिलेला नाही. सोमवारपर्यंत निवडणुकीच्या तारखांचे चित्र स्पष्ट होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी आष्टेकर यांनी स्पष्ट केले. (Election Of Krishna Sahakari Sugar Factory Will Be Held On 19th May Satara Political News)

कृष्णा कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक आष्टेकर यांची नियुक्ती झाली आहे. कऱ्हाडचे उपनिबंधक मनोहर माळी, कोरेगावचे संजय सुद्रीक व महाबळेश्वरचे जे. पी. शिंदे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांच्यासोबत काम पाहणार आहेत. जिल्हा निबंधक आष्टेकर यांनी 19 मेपासून कृष्णाच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव निवडणूक प्राधिकरणाकडे दिला आहे. त्यामुळे चार दिवसांत "कृष्णा'च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची शक्‍यता आहे. सातारा व सांगली जिल्ह्यांतील पाच तालुक्‍यांचे कार्यक्षेत्रातील कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या पक्‍क्‍या याद्या मेच्या पहिल्या आठवड्यात झाल्या. त्यात 47 हजार 160 सभासदांची अंतिम यादी जाहीर झाली. अक्रियाशील 820 सभासदांचा यादीत समावेश झाला आहे.

Krishna Sahakari Sugar Factory
VIDEO पाहा : लॉकडाउनने बदलली शिक्षणाची परिभाषा! वनगळात विद्यार्थिनीची टेरेसवर 'शाळा'

कऱ्हाड व वाळवा तालुक्‍यांत सर्वाधिक सभासद आहेत. त्यामुळे कृष्णाच्या निवडणुकीचा कार्यक्रम येत्या चार दिवसांत जाहीर होण्याची शक्‍यता आहे. अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांनंतर व 20 दिवसांच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो. त्यामुळे 19 मेपासून बिगूल वाजण्याची शक्‍यता आहे. कृष्णाचे निवडणूक निर्णय अधिकारी आष्टेकर यांनीही 19 मेपासून कृष्णाच्या निवडणुका घ्याव्यात, असा प्रस्ताव निवडणूक प्राधिकरणाकडे दिला आहे. श्री. आष्टेकर म्हणाले, ""कृष्णा कारखान्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्या दृष्टीने प्राधिकरणाकडून 19 मेपासून कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यानुसार कार्यक्रम जाहीर झाल्यास मतदान 26, तर 28 जूनला मतमोजणी होईल. त्यादृष्टीने आम्ही तयारी केली आहे. प्राधिकरणाने त्यावरही काहीही कळवले नाही. सोमवारपर्यंत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे.''

Election Of Krishna Sahakari Sugar Factory Will Be Held On 19th May Satara Political News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com