
आमदार घोरपडे यांनी विधानसभा निवडणूक निकालानंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचे सूतोवाच करून तशी तयारी सुरू केली आहे.
कऱ्हाड : यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा (Sahyadri Sugar Factory Election) कार्यक्रम आजपासून (गुरुवार) सुरू होणार आहे. उपनिबंधक कार्यालयाकडून त्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, उद्यापासून पाच मार्चपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत आहे. सहा मार्चला दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. पाच एप्रिल रोजी निवडणूक होणार असून, सहा एप्रिलला मतमोजणी होणार आहे.