esakal | Satara: काले भागातील गावे पुन्हा अंधारात! दहा गावांचे तोडले स्ट्रीटलाइटचे कनेक्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity connections

याचा फटका नागरिकांना बसत आहे.

काले भागातील गावे पुन्हा अंधारात! तोडले स्ट्रीटलाइटचे कनेक्शन

sakal_logo
By
सचिन मोहिते

काले (सातारा): पथदिव्यांच्या वीजबिलाची थकबाकी न भरल्याने ‘महावितरण’ने काले विभागातील संजयनगर, काले, नांदगाव, धोंडेवाडी, भैरवनाथनगर, जुजारवाडी, नारायणवाडी, कालेटेक, मुनावळे या गावांची वीज कनेक्शन बंद केली आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहे.

हेही वाचा: पडळकरांची विनाश काले विपरीत बुद्धी ते बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या; ठळक बातम्या क्लिकवर

जून महिन्यात राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या गावागावांतील स्ट्रीटलाइट महावितरण कंपनीकडून वीजबिल थकबाकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळली होती. वीज वितरण व ग्रामपंचायत यांच्यात शाब्दिक वादावादी झाली होती. अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकले होते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोडगा काढला. मार्च महिन्यापर्यंत वीजबिलाची रक्कम राज्य शासनाच्या वतीने भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. हा वीजबिलाचा विषयही स्थगित आहे. मात्र, एप्रिल महिन्यापासून आजअखेर सर्वच ग्रामपंचायतींना स्ट्रीटलाइट बिल भरणा करण्याबाबत सांगण्यात आले आहे. मात्र, ज्या ग्रामपंचायती वीजबिलाची रक्कम भरणार नाहीत, त्या गावच्या स्ट्रीटलाइटचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. काले विभागातील संजयनगर, काले, नांदगाव, धोंडेवाडी, भैरवनाथनगर, जुजारवाडी, नारायणवाडी, कालेटेक, मुनावळे या गावांच्‍या स्ट्रीटलाइट बंद केल्या आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वीजबिलाची रक्कम जोपर्यंत भरली जाणार नाही, तोपर्यंत गावांना अंधाराचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा: पडळकरांना विनाश काले विपरीत बुद्धि सुचतेय; अजित पवार

ग्रामपंचायतींना बसणार भुर्दंड

ग्रामपंचायतींनी स्ट्रीटलाइट बिल भरणा १५ व्या वित्त आयोगातून करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आल्या होत्या. मात्र, या निधीतून गावातील लहान-मोठी विकासाची कामे केली जातात. परंतु, आता तो निधी वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी वापरावा लागणार आहे. अनेक वर्षांपासून शासन वीजबिल भरत आहे. त्यामुळे याचा अतिरिक्त भार ग्रामपंचायतींना सहन करावा लागणार आहे.

loading image
go to top