
सातारा : सध्या जगावर कोरोनाचं संकट ओढावला असून याचा सर्वाधिक फटका शिक्षणविभागालाही बसला आहे. केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत संकेत दिले आहेत. मात्र, तो अजूनही निर्णय झाला नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांवर टांगती तलवार आहे. त्यातच प्रवेशाबाबत अनिश्चिती असल्यामुळे विद्यार्थ्यांत संभ्रम आहे. मात्र, अनेक ठिकाणी महाविद्यालयांनी प्रवेश देण्यास सुरुवात केल्याने अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांवर गर्दी जमू लागली आहे.
साता-यात अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या यादीने यंदा उच्चांक गाठला आहे. विज्ञान शाखेसाठी शहरातील सयाजी महाविद्यालयात ९७ तर यशवंतराव चव्हाण इन्सिट्यूट ऑफ सायन्स ९२.७० टक्क्यावर कट ऑफ लिस्ट क्लोज झाली. विज्ञानपाठोपाठ वाणिज्यकडे विद्यार्थ्यांचा ओढा राहिल्याने त्याचा कट ऑफही ९०.६० टक्क्यांवर बंद झाला. कला शाखेचाही कट ऑफ ७६.६० टक्क्यांवर आहे. कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्यांचा प्रवेशाकडे ओढा वाढल्याने काॅलेज प्रशानाकडून समाधान व्यक्त केले आहे.
सातारा जिल्ह्यात ४१ हजार १८ विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेसाठी १९ हजार ६०, वाणिज्य शाखेसाठी ९ हजार ८०, विज्ञान शाखेसाठी १८ हजार ८०, संयुक्त शाखासाठी ३ हजार ६४०, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १ हजार २०० अशी मिळून ५१ हजार ६० प्रवेश क्षमता आहे. दि. २१ ऑगस्टअखेर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यात आले होते. सातारा शहरासह कराड शहरातील काही काॅलेजमध्ये दाखल झालेल्या अर्जांची संख्या तिप्पट आहे. आलेल्या अर्जाची छाननी करुन गुणवत्तेनुसार निवड यादी करण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षणविभागाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवारी (ता. २८) पहिली प्रवेश यादी प्रसिध्द करण्यात आली.
सातारा शहरातील यशवंतराव चव्हाण इन्सिट्यूट ऑफ सायन्सची गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर झाली. त्यानुसार (आकडे टक्केवारीचे) खुला ९२.४०, एससी ८०.६०, एसटी ५६.६०, व्हीजेए ८५, एनटीबी ८५.४०, एनटीसी ९०, एनटीडी ८१, ओबीसी ८७.२०, एसबीसी ८१.८०, एनटीसी ९०, माजी सैनिक खुला ८९.६०, ओबीसी ८२.६०, एनटीसी ९०, एससी ८२.६० टक्के अशी आहे. महाराजा सयाजीराव विद्यालयात विज्ञान शाखेसाठी खुला ९७, एससी ९४.२०, एसटी ८९.२०, एनडीड ९२.४०, एनटीसी ९६.२०, ओबीसी ९३, एसबीसी ९६.४०, एनटीए ९६.४०, एनटीबी ९६.८०, कला शाखेसाठी खुला ७६.८०, एससी ४८ टक्के, एनटीए ७१ टक्के, एनटीबी ५५.४०, एनटीसी ६८.८०, ओबीसी ५६ टक्के, वाणिज्य शाखेसाठी खुला ९१.२०, एससी ८०, एनटीए ८३.६०, एनटीबी ८४.६०, एनटीसी ८३, एसबीसी ७९.६०, ओबीसी ८४.६० टक्के, धनजंयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स : खुला ९१, एससी ७३.४, एसटी ४६, व्हीजेए ७८.८०, एनटीबी ७८.८०, एनटीसी ७६.८०, एनटीडी ६३.८०, एसबीसी ७६, ओबीसी ८१.२०, एसईबीसी ८५.४० टक्के अशी आहे.
लालबहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अॅन्ड कॉमर्स सातारा : कॉमर्स खुला ८१.८०, एससी ६१.४०, व्हीजेए ६२, एनटीबी ७९.८०, एनटीसी ६७, ओबीसी ६५.२०, एसईबीसी ७५.८०, एसबीसी ६१.४0, इडब्ल्यूएस ७९.४०, खेळाडू ६७.६० टक्के. सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड : सायन्स खुला ९१.२०, एसईबीसी ९०.८०, एससी ८१.२०, व्हीजेए ८०, एनटीबी ८४.६०, एनटीसी ८९.६०, एनटीडी ८६.६०, ओबीसी ८८, एसबीसी ८७ टक्के. मुधोजी हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज फलटण : वाणिज्य खुला ८०, एससी ७०.२, एसटी ४८.८, व्हीजेए ७७.२, एनटीबी ६९.६, एनटीसी ७४.६, एनटीडी ७३.८, ओबीसी ७५.४, एसईबीसी ७८, एसबीसी ६०, खेळाडू ६९.८, सैनिक पाल्य ५९, अपंग ६६.८ टक्के अशी आहे.
पहिल्या प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांनी आज २९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन फी भरून प्रवेश निश्चित करावा, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचेही पालन करावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. यंदा महाविद्यालये सुरु करण्याबाबतचा अजून निर्णय झाला नसला, तरी विद्यार्थ्यांचे प्रवेश पाहता यावर्षी अॅडमीशन काॅलेजच्या क्षमतेपेक्षा अधिक होणार असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.