

ढेबेवाडी : येथील बसस्थानक परिसराला गेल्या अनेक वर्षांपासून पडलेला टपऱ्यांचा वेढा आज सार्वजनिक बांधकाम विभागाने हटविला. नोटिसा बजावून आणि समक्ष सांगूनही संबंधित व्यावसायिक जुमानत नसल्याने बांधकामचे उपविभागीय अभियंता गिरीश सावंत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरत पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली. काही व्यावसायिकांनी स्वतः टपऱ्या अन्यत्र हटविल्या, तर अनेक टपऱ्या, फलक व अतिक्रमित साहित्य जेसीबीच्या साह्याने डंपरमध्ये भरून पोलिस ठाण्याजवळ जमा केले.