ना बाचाबाची, ना वादावादी; अतिक्रमणांवर शांततेत कारवाई झाली ना भाऊ!

ना बाचाबाची, ना वादावादी; अतिक्रमणांवर शांततेत कारवाई झाली ना भाऊ!
Updated on

खंडाळा (जि. सातारा) : येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. त्यामुळे अतिक्रमणांच्या विळख्याने दबलेल्या मुख्य रहदारीच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी स्थानिक प्रशासनासह धडाकेबाज कारवाई राबविली. नागरिक व वाहनचालकांनी मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले.
 
या वेळी तहसीलदार दशरथ काळे, सार्वजनिक बांधकामचे अभियंता एस. मोदी, मुख्याधिकारी योगेश डोके, पोलिस निरीक्षक महेश इंगळे, नायब तहसीलदार वैभव पवार व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. ही कारवाई खुंटबाचा ओढा ते शिवाजी चौकापर्यंत राबविण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा येऊ नये, म्हणून सात पोलिस अधिकारी, 150 पोलिस कर्मचारी व दंगा विरोधी पथकाला पाचारण करण्यात आले होते. शिरवळ व लोणंदचे पोलिसही बोलविण्यात आले होते. मात्र, कोठेही कसलीही तक्रार किंवा बाचाबाची झाली नाही. ही मोहीम सहायक जिल्हाधिकारी आव्हाळे यांच्या नियंत्रणाखाली तालुका महसूल, बांधकाम विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाने संयुक्तरित्या राबविली.

व्यापा-यांनाे! पुढील आदेश होईपर्यत रविवारचा आठवडा बाजार राहणार बंद
 
दरम्यान, पोलिस बंदोबस्तात सात वाजण्याच्या सुमारास या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अतिक्रमणे काढण्याबाबत कारवाई सुरू होती. चार दिवसांपासून नगरपंचायत प्रशासनाकडून गाडीवरून माईक लाऊन अतिक्रमणांबाबत सूचना देण्यात येत होत्या. भूमिअभिलेखकडून मोजमाप करून अतिक्रमणाच्या फुल्याही मारल्या होत्या. यानंतर कारवाई करण्यात आल्याचे नगरपंचायतीचे मुख्यधिकारी डोके यांनी सांगितले. अतिक्रमणे हटविल्यामुळे रस्ता मोकळा झाला. मात्र, कोरोना संकटाने हैराण झालेल्या काही छोट्या व्यावसायिकांची पुन्हा परवड सुरू झाल्याची चर्चा सुरू होती. स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी या कारवाईचे स्वागत केले. 

चिलीम आणि कोंबडीचं रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होताे...! 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com