
भिलार : महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने शासनाचे अनेक निर्बंध आहे, तसेच आंब्रळ गावानेच सर्वानुमते आपले नियम बनवून गावात बोअर बंदी व विहीर बंदीचा निर्णय घेतला आहे. तरी, आंब्रळ येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीनजीक एका धनदांडग्याने जमीन बेकायदा उत्खननाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोतास धोका निर्माण होणार असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत काम बंद पाडले. दरम्यान, तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उत्खननाच्या कामाचा महसूल यंत्रणेला थांगपत्ताच नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.