ब्रिटिशकालीन 150 वर्षांपूर्वीची 'धर्मशाळा' मोजतेय अखेरची घटका; इतिहासाच्या पाऊलखुणा पुसण्याचा धोका!

प्रवाशांच्या निवासाची सोय असलेली धर्मशाळा (Dharamshala) अखेरची घटका मोजत आहे.
Dharamshala
Dharamshalaesakal
Updated on
Summary

ब्रिटिशांनी या धर्मशाळेची बांधणी केली असावी, असे गावातील ज्येष्‍ठ लोक सांगतात.

शेणोली : रेठरे खुर्द येथे १५० वर्षांपूर्वी कृष्णा नदीतील (Krishna River) नावेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या निवासाची सोय असलेली धर्मशाळा (Dharamshala) अखेरची घटका मोजत आहे. इमारत पुरातन असल्याने ब्रिटिशांनी बांधकाम भक्कम केले आहे. त्यामुळे १५० वर्षांचा कालावधी उलटूनही इमारत उभी असल्याने तिच्या रूपाने इतिहासाची पाऊलखुणा ऐतिहासिक ठरत आहे.

Dharamshala
राधानगरी धरणाचा पर्यटन विकास दृष्टिपथात; आराखडा मंजुरी अंतिम टप्प्यात, 31 कोटी 32 लाखांचा प्रस्ताव

सध्या या धर्मशाळेला अखेरची घरघर लागली आहे. जवळच कृष्णा नदीवर सध्या उंच पूल बांधणीचे काम सुरू आहे. या कामात धर्मशाळेचे अस्तित्व धोक्यात येणार की काय? अशी भीती व्यक्त होत आहे. गावाजवळून कृष्णा नदी दुथडी भरून वाहते. १९५० च्या दशकात नदीवर लाकडी पूल होता.

त्याआधी नावेच्या साहाय्याने नदीतून ये- जा केली जायची. त्यावेळी रात्री उशीर झाल्यास लोकांना निवासाची सोय असावी, यासाठी ब्रिटिशांनी या धर्मशाळेची बांधणी केली असावी, असे गावातील ज्येष्‍ठ लोक सांगतात. दिवसभर रेठरे खुर्द व रेठरे बुद्रुक येथील नदीकाठावर आलेले लोक नदीतून अलीकडे- पलीकडे प्रवास करायचे.

Dharamshala
गोव्याच्या पर्यटन धोरणाचा मालवणला मोठा फटका; पर्यटन पॅकेज सुविधेत बदल, पर्यटकांची संख्याही रोडावली

कालांतराने प्रख्यात जलतज्ज्ञ सदुभाऊ पाटील यांच्या अभ्यासातून तेथे लाकडी पुलाची उभारणी झाली. त्या पुलावरून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ऊस वाहतूक धावेच्या बैलगाडीतून व्हायची. त्यावेळेस लोकांचा प्रवास पुलावरून व्हायचा; परंतु हा पूल पावसाळ्यात उपयुक्त ठरत नव्हता. माजी मंत्री यशवंतराव मोहिते यांनी नदीवर पक्का पूल केल्यानंतर लाकडी पूल व नदीतील नावेतून होणारा प्रवास कालबाह्य झाला.

Dharamshala
Islampur Politics : अजितदादांच्या व्यासपीठावर 'शिळ्या कढीला ऊत'; आमदार जयंत पाटलांना शह देणं अशक्य?

४५ कोटी खर्चातून पूल..

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून सुमारे ४५ कोटी रुपये खर्चातून होणाऱ्या नवीन पुलाचे काम गतीने सुरू आहे. या कामाजवळ नदीकाठी धर्मशाळेची इमारत आहे व तिला अखेरची घरघर लागली आहे. पुलाच्या कामामध्ये ही धर्मशाळा नाहीशी होणार की काय? याची भीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The project is expected to improve irrigation, drinking water supply and water storage in Solapur, Satara and Pune districts.
Maharashtra Karnataka Krishna River water dispute
Crocodile attack on swimmer in Sangli
All Four Bridges Submerged, Shocking Visuals Emerge
Marathi News Esakal
www.esakal.com