esakal | शिवपुतळ्यावरुन फडणवीसांचा मुश्रीफांवर हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

शिवपुतळ्यावरुन फडणवीसांचा मुश्रीफांवर हल्लाबोल

मुश्रीफ यांचा माझ्यावर विश्वास आहे. पण, मुळात कर्नाटकातील त्या गावातील पुतळ्यास काँग्रेसच्या आमदाराचा विरोध आहे. तो आज काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे. पण, तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता त्या आपल्या सहकारी पक्ष्याला सांगायचे ते विरोधी पक्ष्याच्या नेत्याला सांगता, अशी सडकून टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुश्रीफांवर केली.

शिवपुतळ्यावरुन फडणवीसांचा मुश्रीफांवर हल्लाबोल

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कर्नाटकातील मनुगत्ती (जि. बेळगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तेथील काँग्रेसच्या आमदाराचा विरोध आहे. ते आता प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, त्या आपल्या सहकारी पक्ष्याला सांगायचे ते विरोधी पक्षाच्या नेत्याला सांगताय. उगीच राजकारण कशाला करायचे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला. ते सातारा येथील दौ-यावर असताना बोलत होते. 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तुमच्याकडे दोन गोष्टींची मागणी केली आहे. यामध्ये कर्नाटकातील मनुगत्ती गावात पुन्हा पुतळा बसवावा आणि अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, अशी त्यांची तुमच्याकडे मागणी आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, चांगले आहे की मुश्रीफ यांचा माझ्यावर विश्वास आहे. पण, मुळात कर्नाटकातील त्या गावातील पुतळ्यास काँग्रेसच्या आमदाराचा विरोध आहे. तो आज काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे. पण, तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता त्या आपल्या सहकारी पक्ष्याला सांगायचे ते विरोधी पक्ष्याच्या नेत्याला सांगता.

देवेंद्र फडणवीस यांनी साता-यात ठाकरे सरकारला विचारला जाब; म्हणाले, तुम्हाला हे बरं चालतं!


महाराजांच्या पुतळ्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन. प्रसंगी तेथे जाऊन आंदोलन करेन. पण, उगीच राजकारण कशाला करायचे, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. अलमट्टीबाबत ते म्हणाले, अलमट्टीची उंची वाढू शकत नाही. आताची उंचीही महाराष्ट्राला मान्य नाही. त्यावेळी आमच्या राज्यकर्त्यांनी आक्षेप न घेतल्यामुळे आज ही उंची आली आहे. याच्यापेक्षा त्या धरणाची उंची वाढूच शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image