

दहिवडी : गायब झालेला मुलगा मीच असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांद्वारे वृद्ध महिलेची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा दहिवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. संबंधित भोंदूबाबाचे नाव एकनाथ रघुनाथ शिदे (रा. ओझर बुगा, ता. जामनेर, जि. जळगाव) असे असून, त्यास शिंदी बुद्रुक (ता. माण) येथून जेरबंद करण्यात आले आहे. अधिक चौकशीत तो मालमत्ता बळकावण्याच्या उद्देशाने वृद्ध नागरिकांना फसवणारा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.