
सातारा : बाहेरच्या जिल्ह्यात सध्या बोगस पीक विमा काढण्याची प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत. सातारा कृषी विभागाने यावर्षी पुढाकार घेत बोगस पीक विमा घेतलेली प्रकरणे उघड करत शासनाचे साडेपाच कोटी रुपये वाचविले आहेत. यामध्ये खरिपातील कांदा पिकासाठी घेतलेल्या बोगस पीक विम्याची १८ हजार, तर फळबागेची २५० प्रकरणे उघडकीस आणली आहेत. शासनाची फसवणूक करणाऱ्यांना चाप बसविला आहे. या कामगिरीची शासनाने दखल घेत कृषी विभागाला पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.