शेतकऱ्यांसाठी Good News! रेल्वेकडून जमिनीचा मिळाला पाचपट मोबदला

Railway Project
Railway Projectesakal

कऱ्हाड (सातारा) : पार्ले, बाबरमाची, सयापूर, यशवंतनगर, शिरवडे या कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांना (Farmers Of Karad Taluka) पुणे-मिरज -लोंढा रेल्वे Pune-Miraj-(Londha Railway Project) दुहेरीकरणामध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे (Shetkari Sanghatana) नेते सचिन नलवडे यांनी आंदोलन, मोर्चे काढून सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना पाचपट मोबदला मिळाला आहे. प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. (Farmer Got Money For Farm Land From Pune-Miraj-Londha Railway Project bam92)

Summary

शेतकऱ्यांना मोबदला न देता रेल्वे विभागाने विविध ठिकाणी कामे सुरु केली होती.

शेतकऱ्यांची जमीन रेल्वेच्या दुहेरीकरणात गेली. शेतकऱ्यांना मोबदला न देता रेल्वे विभागाने विविध ठिकाणी कामे सुरु केली होती. शेतकऱ्यांची जमीन आमचीच असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत होते. शेतकऱ्यांना सोबत घेवून शेतकरी संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी एक मोठा लढा उभा केला. रेल्वेची विना मोबदला सुरु असलेली कामे नलवडे यांनी बंद केली. त्यानंतर तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले, तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, तत्कालीन प्रांताधिकारी हिम्मत खराडे, भूसंपादन शाखेचे दिनकर ठोंबरे व रेल्वे अधिकारी यांची शेतकऱ्यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी सातबाऱ्याप्रमाणे मोजण्याचे ठरले.

त्यानुसार झालेल्या मोजणीत प्रस्तावातील जमिनीच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त जमीन रेल्वेसाठी संपादित होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रेल्वेकडून शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. प्रांताधिकारी दिघे यांच्या हस्ते पार्लेतील शेतकऱ्यांना मोबदल्याच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी श्री. नलवडे, बाधित शेतकरी दिनकर नलवडे, भीकू नलवडे, तुकाराम नलवडे, भीमराव पाटील, रामचंद्र जाधव, संजय नलवडे, तानाजी जाधव, अशोक नलवडे, तानाजी नलवडे, शिवाजी नलवडे, विनोद नलवडे, संतोष नलवडे, सनी नलवडे, सचिन पाटील उपस्थित होते.

'सकाळ'चेही मानले आभार

शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना मिळावा, यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले. प्रसंगी आंदोलन, मोर्चे काढण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरु ठेवण्याचा निर्धार करण्यात आला होता. यामध्ये 'सकाळ'ने मोठी साथ दिली. लढा यशस्वी होण्यात 'सकाळ'ची चांगली साध मिळाली, असे शेतकरी संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी सांगितले.

Railway Project
पुणे जिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या सहीचे बनावट पत्र देऊन युवकाची फसवणूक

..अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल : अनिल घराळ

कालगाव येथील जमिनीच्या मोबदल्याच्या विरोधात तेथील बाधित शेतकरी उच्च न्यायालयात गेले आहेत. न्यायालयात दावा दाखल असूनही जिल्ह्यातील रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे काम चालू आहे, हा न्यायालयाचा अवमान आहे. त्याबाबत शेतकर्‍यांच्या मनात तीव्र संताप आहे. ही प्रक्रिया त्वरित थांबवावी, अन्यथा त्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते अनिल घराळ यांनी दिला. 

Railway Project
आबांची भाषणं ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला

कालगाव सातारा येथील माजी सैनिक रामचंद्र संपत माने वगैर शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेले आहे. ती बाब न्यायप्रविष्ट आहे. यामुळे कालगाव ' गट नंबर 496, 497, 495, 323, 318, वगैरे शेत जमीन मिळकती शेतकऱ्यांना मोबदला न देता रेल्वे प्रशासन ताबा घेत आहे. तो प्रकार तत्काळ थांबवावा. उच्च न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ट असल्याचा विचार होऊन तात्काळ कामकाज थांबवावे. जबरदस्तीने विनामोबदला काम करण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र संघर्ष व आंदोलन करण्यात येईल, अशा शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन दिले आहे. घराळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळाने संबंधित शेतकरी व संघटना पदाधिकारी यांच्यातर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यानुसार कार्यवाही व्हावी यासाठी शेतकरी संघटना आक्रमक आहे. त्यात क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष हिंदुराव पाटील, दक्षिण अध्यक्ष संजय थोरात, तालुका उपप्रमुख लालासाहेब पाटील, विभाग प्रमुख जयवंत पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश निकम, मेजर रामचंद्र संपत माने, आनंदराव शिंदे, मानसिंगराव पाटील, प्रसाद पाटील, ज्ञानदेव पाटील, पांडुरंग पाटील, फैयाज नामदार, जिकर बागवान, ज्ञानदेव पाटील यांनीही निवेदन दिले आहे.

Farmer Got Money For Farm Land From Pune-Miraj-Londha Railway Project bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com