सातारा : खटाव तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या घशात मटणाचे हाड अडकण्याची (Satara Farmer Throat Bone) विचित्र घटना घडलीये. मित्रांसोबत आखाडी साजरी (Aakhadi) करताना जेवण सुरू असतानाच घरातील मांजराने ताटावर पंजा मारण्याचा प्रयत्न केला. मांजराला हाकलताना शेतकऱ्याच्या घशात मटणाचे हाड चुकून अडकले. दोन दिवस छातीत दुखत राहिल्याने त्यांनी अखेर रुग्णालयात धाव घेतली आणि एन्डोस्कोपीद्वारे (Endoscopy) हाड काढण्यात आल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळाला.