कांद्याचे दर घसरताच शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीकडे कल

Onion
Onionesakal

खटाव (सातारा) : सद्य:स्थितीत कांद्याचे (Onion) दर घसरल्याने शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीकडे कल वाढत आहे. त्याबरोबरच लॉकडाउनमुळे (lockdown) मागणीसह उत्पादनातील घट, कांदा बियाणातील फसवणूक व अवकाळी पावसामुळे (Rain) कांद्याचे पीक अडचणीत आले आहे. मात्र, तरीही यावर्षी तालुक्‍यात शेतकऱ्यांनी या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कांद्याचे विक्रमी पीक घेतलेच घेतले, पण दर वधारेपर्यंत कांदा साठवून ठेवण्याकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी (Farmers) वळू लागल्याचे दिसून येत आहे. (Farmers Are Stocking Onions As Onion Rate Have Come Down Satara Agro News)

Summary

गेल्या काही वर्षांत कांद्याच्या दरात सातत्याने तेजी राहिल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले.

गेल्या काही वर्षांत कांद्याच्या दरात सातत्याने तेजी राहिल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. कांद्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम केल्याने स्वाभाविकच कांद्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. सप्टेंबरपासून वरचेवर अवकाळी पावसाने गोंधळ घातल्यामुळे कांदा बियाणांची अभूतपूर्व टंचाई निर्माण होऊनही तालुक्‍यात विक्रमी उन्हाळ कांदा लागवड झाली होती.

Onion
VIDEO पाहा : वरुणराजाची दमदार बरसात; खटावात भुईमूग काढणीला वेग

महागड्या बियाण्यांमुळे कांदा उत्पादन खर्चात वाढ झालीच, पण बहुतांश बियाणे भेसळयुक्त निघाल्याने उत्पादनातही प्रचंड घट सोसावी लागली. सततच्या बदलत्या हवामानामुळे खते, औषधांवर खर्च करण्यात आला. एवढे सगळे करूनही कांद्याला योग्य दर नसल्याने शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. यामुळे तालुक्‍यातील अनेक गावांतील शेतकरी कांदा चाळीकडे वळले असून सद्या कांदा चाळीत साठवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. कांदाचाळ वातानुकुलित ठरत असल्याने कांदा अनेक दिवस टिकून राहण्यास मदत होत आहे.

Farmers Are Stocking Onions As Onion Rate Have Come Down Satara Agro News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com