मालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांची वणवण

पुसेगावात मार्केट यार्डासह वखार महामंडळाच्या गोदामाचे काम रखडले
satara
satarasakal

विसापूर : वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या(Agricultural Produce Market Committee) कार्यक्षेत्रात शेतमाल खरेदी- विक्रीची कायदेशीर व्यवस्था बंद आहे. त्यामुळे खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी वणवण फिरावे लागत आहे.सद्यःस्थितीत, खरेदी- विक्रीच्या व्यवहारासाठी बाजार समितीचे गाळे सुरू नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना फलटण, सातारा, पुणे, कोल्हापूर, मुंबई आदी ठिकाणच्या मार्केट यार्डापर्यंत घेऊन जात शेतीमालाची विक्री करावी लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना गाडीभाड्यासाठी जादा पैसे खर्च करावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ज्या शेतकऱ्यांचा शेतमाल अत्यल्प असेल किंवा ज्यांना वाहतूक करणे शक्य नसेल अशा शेतकऱ्यांना परिसरातील व्यापाऱ्यांना बांधावर बोलावून शेतमालाचा व्यवहार करावा लागत आहे.

satara
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू; 3 दिवस करता येणार प्रवास

बांधावर शेतमालाचा व्यवहार होत असताना कोणताही व्यापारी शेतकऱ्यांना सौद्याची पावती देत नाहीत. त्यामुळे भविष्यात शेतकरी आणि व्यापारी यांच्यात ठरलेल्या सौद्यात आर्थिक अडचणी निर्माण झाल्यास फसवणुकीच्या तक्रारीस वाव राहात नाही. कित्येकदा अधिकृत लायसन्स नसलेले काही व्यापारी रोख व्यवहार न करता वायद्यावर लाखो रुपयांचा शेतमाल खरेदी करतात आणि शेतकऱ्यांचे पैसे बुडवतात किंवा ठरलेल्या सौद्याच्या दरापेक्षा कमी दराने पैसे देतात. अशा फसवणुकीबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात; पण व्यवहाराची पावती किंवा कोणताही पुरावा नसल्याने शेतकऱ्यांना कुठेच न्याय मागता येत नाही.

satara
कोरोनाला हरवायचंय; विकासाचं काम करायचंय -मिलिंद शंभरकर

शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी- विक्री(Buy-sell) सोयीस्कर व्हावी, व्यवहार पारदर्शक व्हावेत, यासाठी वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीने पुसेगाव येथे पाच एकर जागेत मार्केट यार्ड(market yard) उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुख्य रस्त्यापासून या मार्केट यार्डाकडे जाण्यासाठीच्या रस्त्याचा प्रश्न उद्भवल्याने हे काम रखडले आहे. शेतकऱ्यांना शेतमालाची साठवणूक करता यावी, यासाठी वखार महामंडळाने गोदामाच्या इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. मात्र, ते कामही रस्त्याच्या प्रश्नामुळे रखडले असून, कोट्यवधी रुपये खर्च करून उभी केलेली गोदामाची इमारत अक्षरशः धूळ खात पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com