तीन महिन्यांनंतरही नियमित कर्ज फेडणारे शेतकरी वाऱ्यावर!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 February 2021

त्यातून महाविकास आघाडी सरकारने तिन्ही पक्षांच्या विचारविनिमयातून आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली.

कऱ्हाड : शेतकऱ्यांना शेती कर्जमाफी देतानाच सरकारकडून जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करतात, त्यांनाही 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याला तीन महिन्यांहून अधिक काळ झाला तरीही शेतकऱ्यांना त्यातील दमडीही मिळालेली नाही. त्यातून जिल्ह्यातील दोन लाख 50 हजार शेतकऱ्यांना सुमारे 600 कोटी रुपये मिळणार होते. मात्र, सरकारने जाहीर केलेली प्रोत्साहनपर रक्कम कागदावरच राहिल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने सत्तेवर आल्यावर पहिल्यांदा भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने नियम व अटी घालून जाहीर केलेली कर्जमाफी न करता शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यामुळे संबंधित सरकारमधील दोन्ही कॉंग्रेसला कर्जमाफी करणे प्रतिष्ठेचे बनले होते. त्यातून महाविकास आघाडी सरकारने तिन्ही पक्षांच्या विचारविनिमयातून आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांच्यावर अन्याय नको म्हणून त्या शेतकऱ्यांनाही 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचीही घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे नियमित कर्जदार शेतकरी आनंदात होते. मात्र, त्या घोषणेला तीन महिन्यांचा कालावधी झाला तरीही शेतकऱ्यांना त्या 50 हजारांतील दमडीही मिळालेली नसून ती कागदावरच राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांचे सुमारे 600 कोटी रुपये सरकारकडून येणे थकीत राहिले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
 
दरम्यान, 50 हजारांच्या वर ज्यांची रक्कम आहे, त्यांना 50 हजार रुपये त्यांच्या सेव्हिंग्जच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहेत. त्याचबरोबर ज्यांनी 50 हजारांपेक्षा कमी कर्ज घेतले आहे, त्यांना त्यांच्या कर्जाच्या रकमेएवढी रक्कम त्यांच्या खात्यावर शासनाकडून जमा करण्यात येणार आहे. 

""सरकारने घोषणा करूनही 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलेच नाही. सध्या वीजबिले भरण्याचे मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यांपुढे आहे. जोपर्यंत ते 50 हजार मिळत नाहीत, तोपर्यंत महावितरणने वीजबिले शेतकऱ्यांना मागू नयेत.'' 

सुरेश फिरंगे, शेतकरी

चोरट्यांनी पेैसे पळविलेच पण जाताना घरातील सफरचंदावरही डल्ला मारला 

साताऱ्यात रुग्ण वाढले; नियमांची अंमलबजावणी सुरु, दुकानदारांसह हॉटेलचालकांवर कारवाई

सहा विद्यार्थी कोरोनाबाधित; शिक्षक सुखरुप, विद्यालय बंद

इथं काेणच डाॅन नाही 

घराच्या बाहेर न पडता ही 5 योगासनं करा; साथीचे रोग होतील कायमचे दूर

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Demands Loan To Be Reimburse Satara Marathi News